Download App

आफ्रिकेकडून गतविजेत्या इंग्लंडची धुलाई; विजयासाठी 400 धावांचे टार्गेट

World Cup 2023: विश्वचषकाचा (World Cup 2023) पहिला सामना आज मुंबईतील वानखडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) खेळवला जात आहे. इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका (ENG vs SA) यांच्यात खेळला जाणारा हा विश्वचषकातील 20 वा सामना आहे. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, मात्र दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी मोठी धावसंख्या उभारली. दक्षिण आफ्रिकेने गतविजेत्या इंग्लंडविरुद्ध 50 षटकांत 7 गडी गमावून 399 धावा केल्या. आता जर इंग्लंडला हा सामना जिंकायचा असेल तर त्यांना विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या 400 टार्गेट चेस करावे लागेल.

दक्षिण आफ्रिकेची सुरुवात चांगली झाली नाही आणि त्यांचा फॉर्मात असलेला फलंदाज क्विंटन डी कॉक अवघ्या 4 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. मात्र, त्यानंतर रीझा हेंड्रिक्स आणि रॅसी व्हॅन डर ड्युसेन यांनी दुसऱ्या विकेटसाठी 121 धावांची भागीदारी करून डाव तर सांभाळलाच, शिवाय आपल्या संघाला मोठ्या धावसंख्येकडे नेले. दक्षिण आफ्रिकेच्या या डावात सर्व फलंदाजांनी चांगली फलंदाजी करत योगदान दिले.

रीझा हेंड्रिक्सने 75 चेंडूत 85 धावा, रॅसी व्हॅन डर डुसेनने 61 चेंडूत 60 धावा, कर्णधार एडन मार्करामने 44 चेंडूत 42 धावा केल्या. यानंतर हेनरिक क्लासेन मैदानात आला आणि त्याने आपल्या जबरदस्त फलंदाजीचे प्रदर्शन केले. त्याने शतक झळकावत संघाची धावसंख्या 350 धावांच्या पुढे गेली.

राज्यात बिअर विक्रीत मोठी घट! खप वाढवण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय

क्लासेन आणि मार्को जॅनसेन यांनी सामना बदलला
मधल्या षटकांमध्ये इंग्लंडच्या गोलंदाजांनी पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, परंतु क्लासेन आणि मार्को जॅन्सन यांच्यातील भागीदारीमुळे डाव पूर्णपणे दक्षिण आफ्रिकेकडे वळला. क्लासेनने 67 चेंडूत 109 धावांची खेळी केली. मार्को जॅनसेनने 42 चेंडूत 75 धावांची शानदार खेळी करत संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेले. 7व्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या मार्को जॅनसेनने आपल्या खेळीत 3 चौकार आणि 6 षटकार ठोकले.

India vs New Zealand : हार्दिक पांड्याच्या जागी कोणाला मिळणार संधी? ‘या’ नावांची चर्चा

इंग्लंडकडून सहा गोलंदाजांचा वापर केला मात्र दोनच गोलंदाजांना यश मिळाले. रीस टोपलीने 3 तर आदिल रशीदला 2 विकेट घेण्यात यश आले. या दोघांशिवाय इंग्लंडच्या एकाही गोलंदाजाला विकेट मिळवता आली नाही. आता गतविजेता इंग्लंड दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या या धावसंख्येचा पाठलाग करण्यात यशस्वी होते की नाही हे काही वेळात कळेल. मात्र, मुंबईच्या वानखडे स्टेडियममध्ये मोठी धावसंख्या बनवली जाते आणि संघ दुसऱ्या डावातही मोठ्या धावसंख्येचा पाठलाग केला जातो, असा इतिहास आहे.

Tags

follow us