Download App

Ashes 2023 : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या 2 कसोटी सामन्यांसाठी इंग्लंडचा संघ जाहीर

  • Written By: Last Updated:

Ashes 2023:  ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील अॅशेस मालिकेतील पहिला कसोटी सामना 16 जूनपासून खेळवला जाणार आहे. एजबॅस्टनच्या मैदानावर दोन्ही संघ आमनेसामने असतील. तर मालिकेतील दुसरा कसोटी सामना 28 जूनपासून लॉर्ड्सवर खेळवला जाणार आहे. त्याचबरोबर इंग्लंडने पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी आपला संघ जाहीर केला आहे. इंग्लंडने आपल्या संघात जोश टंगचा समावेश केला आहे. जोश टंग कौंटी क्रिकेटमध्ये वूस्टरशायरकडून खेळतो. या खेळाडूने आयर्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यातून कसोटी पदार्पण केले.

यष्टिरक्षक फलंदाज जॉनी बेअरस्टो अॅशेस मालिकेतून पुनरागमन करणार

इंग्लंडचा यष्टीरक्षक फलंदाज जॉनी बेअरस्टो अॅशेस मालिकेतून पुनरागमन करेल, तर बेन फोक्सला बाहेर बसावे लागू शकते. वास्तविक, जॉनी बेअरस्टो दुखापतीचा बळी ठरला होता, त्यानंतर तो मैदानापासून दूर होता. याशिवाय जोफ्रा आर्चर, क्रेग ओव्हरटन, ओली स्टोन आणि जेमी ओव्हरटन हे इंग्लंड संघाचा भाग असणार नाहीत. जोफ्रा आर्चरशिवाय क्रेग ओव्हरटन, ओली स्टोन आणि जेमी ओव्हरटन हे दुखापतीतून सावरलेले नाहीत. मात्र, अ‍ॅशेस मालिकेतील पहिल्या 2 कसोटी सामन्यांनंतर संघात बदल शक्य आहे, असे मानले जाऊ शकते. विशेष म्हणजे 16 जूनपासून ऍशेस मालिकेतील पहिला कसोटी सामना खेळवला जाणार आहे. एजबॅस्टनच्या मैदानावर दोन्ही संघ आमनेसामने असतील. तर मालिकेतील दुसरा कसोटी सामना 28 जूनपासून लॉर्ड्सवर खेळवला जाणार आहे.

Wrestlers Protest : विश्वविजयी ‘टीम 83’ कुस्तीपटूंच्या पाठिशी; क्रिकेटचा ‘देव’ मात्र शांतच

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या 2 कसोटी सामन्यांसाठी इंग्लंड संघ-

बेन स्टोक्स (C), जेम्स अँडरसन, जॉनी बेअरस्टो, स्टुअर्ट ब्रॉड, हॅरी ब्रूक, झॅक क्रॉली, बेन डकेट, डॅन लॉरेन्स, जॅक लीच, ऑली पोप, मॅथ्यू पॉट्स, ऑली रॉबिन्सन, जो रूट, जोश टोंग, ख्रिस वोक्स, मार्क वुड

Tags

follow us