Download App

बर्मिंगहॅममध्ये भारताचा ऐतिहासिक विजय; 336 धावांनी इंग्लंडला नमवलं, मालिकेत बरोबरी…

England vs India 2nd Test Match Result : टीम इंडियाने इंग्लंडसमोर विजयासाठी 608 धावांचं आव्हान ठेवलं होतं.

England Vs India : कसोटी सामन्यात भारताने इंग्लडचा 336 धावांनी (England Vs India) नमवत दणदणीत विजय मिळवलायं. आकाश दीप आणि मोहम्मद सिराजच्या वेगवान गोलंदाजीने इंग्लडच्या भूमीत एक नवा इतिहास घडवलायं. इंग्लडने भारतासमोर 608 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र, भारतीय संघाच्या गोलंदाजांनी इंग्लडला 68.1 ओव्हरमध्ये 271 धावांवरच गुंडाळून दणदणीत विजय मिळवलायं.

भारताने या विजयासह कसोटी क्रिकेटच्या इतिहासात बर्मिंगहॅममध्ये पहिलावाहिला विजय मिळवला आहे. त्यासोबतच भारताने 5 सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबर केली आहे. इंग्लंडने टॉस जिंकून भारताला फलंदाजीसाठी भाग पाडलं. भारताने कर्णधार शुबमन गिल याच्या ऐतिहासिक द्विशतकी खेळीच्या जोरावर पहिल्या डावात 587 धावांचा डोंगर उभारला. शुबमनने 269 धावा केल्या. यशस्वी जैस्वालने 87 तर रवींद्र जडेजा याने 89 धावा केल्या. वॉशिंग्टन सुंदरने 42 आणि करुण नायर याने 31 धावा जोडल्या. भारताने यासह 151 षटकांमध्ये सर्वबाद 587 धावा केल्या.

ENG vs IND : आकाश दीपचा पंच, टीम इंडियाचा बर्मिंगहॅममध्ये ऐतिहासिक विजय, इंग्लंडचा 336 धावांनी धुव्वा, मालिकेत बरोबरी
England vs India 2nd Test Match Result : टीम इंडियाने इंग्लंडसमोर विजयासाठी 608 धावांचं आव्हान ठेवलं होतं.

follow us

संबंधित बातम्या