IPL 2027 : चेन्नई सुपर किंग्स आयपीएल 2027 साठी जोरदार तयारी करताना दिसत आहे. नुकतंच मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंगने मुख्य प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिल्यानंतर संघ व्यवस्थापक मुख्य प्रशिक्षक म्हणून कोणाची निवड करणार याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागून आहे. तर आता एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. चेन्नई सुपर किंग्स आयपीएल 2027 साठी इंग्लंडचा स्टार खेळाडू इऑन मॉर्गन मुख्य प्रशिक्षक होणार असं सांगण्यात येत आहे. संघाकडून आपल्या स्टार खेळाडूंसाठी फिटनेस कॅम्प आयोजित करण्यात आले असून यात सहभागी होण्यासाठी महेंद्रसिंग धोनी आणि ऋतुराज गायकवाड चेन्नईत दाखल झाले आहेत. तर दुसरीकडे रविचंद्रन अश्विनने इऑन मॉर्गन चेन्नईचा नवीन मुख्य प्रशिक्षक होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
आपल्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना अश्विन (Ravichandran Ashwin) म्हणाला, मला वाटते की, इऑन मॉर्गन (Eoin Morgan) येऊ शकतो.. त्याच्या नावाचा गांभीर्याने विचार केला जात आहे… प्राथमिक चर्चा सुरू आहे यात शंका नाही. याचे दोन पैलू आहेत. इऑन मॉर्गन ही जबाबदारी केवळ या वर्षासाठी स्वीकारेल की, मिनी-लिलावादरम्यान दुसरा कोणीतरी संघ तयार करेल आणि मॉर्गन नंतर संघात सामील होईल? तर दुसरीकडे चेन्नई सुपर किंग्सच्या (CSK) पुढील मुख्य प्रशिक्षकपदासाठी सध्या अनेक नावांची चर्चा सुरू आहे, ज्यामध्ये इंग्लंडचे सध्याचे वनडे आणि टी20 प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलमचाही समावेश आहे.
🚨 NEW HEAD COACH OF CSK 🚨
– Ravichandran Ashwin suggest Eoin Morgan could be the next Head Coach of CSK.
– MS Dhoni long talk with Brendon McCullum.
– Andrew Flintoff resigned as Head Coach of England lions.
It has been confirmed that CSK’s next head coach will be from… pic.twitter.com/BY4ON9MD2l
— VIKAS (@Vikas662005) August 12, 2026
खाणमाफियांना फडणवीस सरकार मोठा दणका देणार; IAS रूबल अग्रवाल राज्यभर लक्ष ठेवणार
रविचंद्रन अश्विन पुढे म्हणाला की, चेन्नई सुपर किंग्स इऑन मॉर्गनला सुमारे चार वर्षांचा करार देऊ शकते. यामुळे मॉर्गनला IPL 2028 च्या मेगा-लिलावापूर्वी स्वतःचा संघ उभारण्याची संधी मिळेल. सध्या सीएसकेचा कर्णधार ऋतुराज गायकवाड, अनुभवी महेंद्रसिंग धोनी, संघाचे सीईओ काशी विश्वनाथन आणि मालक रूपा गुरुनाथ हे सर्वजण चेन्नईत उपस्थित आहेत. त्यामुळे, सीएसकेच्या पुढील मुख्य प्रशिक्षकाबाबतची घोषणा आगामी दिवसांत होऊ शकते.
