IPL 2027 ‘इम्पॅक्ट प्लेयर’ नियम रद्द होणार? बीसीसीआय घेणार मोठा निर्णय

IPL 2027 : बीसीसीआयकडून आयपीएल 2027 साठी जोरदार तयारी सुरु झाली असून आता समोर आलेल्या माहितीनुसार, बीसीसीआय आयपीएल 2027 मध्ये

IPL 2027

IPL 2027 : बीसीसीआयकडून आयपीएल 2027 साठी जोरदार तयारी सुरु झाली असून आता समोर आलेल्या माहितीनुसार, बीसीसीआय आयपीएल 2027 मध्ये इम्पॅक्ट प्लेयर रद्द करण्याचा विचार करत आहे. गेल्या काही दिवसांपासून हा नियम रद्द करण्यात यावा अशी मागणी अनेक स्टार खेळाडूंकडून करण्यात येत आहे. तर आता समोर आलेल्या माहितीनुसार, या नियमाबाबत बीसीसीआयने आयपीएलमधील सर्व 10 फ्रँचायझींकडून प्रतिक्रिया मागवण्यात आल्या आहेत. सर्व 10 फ्रँचायझींना बीसीसीआयने 31 ऑगस्टपर्यंत प्रतिक्रिया देण्यासाठी मुदत दिली आहे.

आयपीएल 2023 पासून ‘इम्पॅक्ट प्लेयर’ नियम (Impact Player Rules) लागू करण्यात आला. रणनीती अधिक प्रभावी करणे आणि सामन्यांमधील उत्कंठा वाढवणे हा यामागचा उद्देश होता. या नियमानुसार, संघांना ‘प्लेइंग इलेव्हन’ (मैदानावर उतरणारे अकरा खेळाडू) व्यतिरिक्त पाच पर्यायी खेळाडूंची नावे जाहीर करावी लागतात. गरजेनुसार ‘इम्पॅक्ट प्लेयर’ फलंदाजी किंवा गोलंदाजी करू शकतो. हा खेळाडू डावाच्या सुरुवातीला किंवा डावादरम्यान कधीही मैदानात येऊ शकतो.

या नियमामुळे सामन्यांमधील रंगत वाढली असली तरी, त्यावर टीकाही झाली आहे. अनेक दिग्गज खेळाडू आणि तज्ज्ञांच्या मते, यामुळे फलंदाजी आणि गोलंदाजी यांच्यातील समतोल बिघडत आहे आणि अष्टपैलू खेळाडूंच्या विकासात अडथळा येत आहे. गेल्या हंगामात अनेक सामन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात धावा झाल्या, ज्यामुळे गोलंदाज हतबल झाल्याचे दिसून आले.

अशोक खरातविरोधात लैंगिक अत्याचाराचे 8 गुन्हे; जामिनाला सरकारी पक्षाचा विरोध-

तर दुसरीकडे बीसीसीआयने फ्रँचायझींकडून इतर अनेक मुद्द्यांवरही प्रतिक्रिया मागवल्या आहेत. यामध्ये PMOA (खेळाडू व्यवस्थापन आणि कामकाज क्षेत्र), अंपायरिंग, सराव सत्रे आणि खेळाच्या अटींशी संबंधित बाबींचा समावेश आहे. परंतु संघांना पाठवलेल्या पत्रातील सर्वात महत्त्वाचा विषय ‘इम्पॅक्ट प्लेयर’ नियम हाच होता. ‘इम्पॅक्ट प्लेयर’ नियमाव्यतिरिक्त, गेल्या आयपीएल हंगामातील आणखी एक मोठा मुद्दा म्हणजे भ्रष्टाचार-विरोधी नियमांचे उल्लंघन ज्यामध्ये काही लोकांनी परवानगीशिवाय PMOA क्षेत्रात प्रवेश केला होता. यामुळे बीसीसीआयला खेळाडू, सपोर्ट स्टाफ आणि मालकांसाठी हंगाम सुरू असतानाच मार्गदर्शक सूचना जारी कराव्या लागल्या.

follow us