आयपीएलमध्ये सूर्यकुमार यादव फ्लॉप; आता टी-20 चे कर्णधारपद जाणार ? बीसीसीआयने नवा चेहरा शोधला…

Suryakumar Yadav -आंतरराष्ट्रीय सामन्यात सूर्यकुमार यादव चांगली फलंदाज करतो. परंतु काही महिन्यांपासून धावांसाठी तो संघर्ष करत आहे.

Surya Yadhav Bcci

Shreyas Iyer Likely To Replace Suryakumar Yadav As India’s T20I Captain: टी-20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवबाबत ( Suryakumar Yadav) बीसीसीआय (BCCI) महत्त्वाचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. यादव याचे कर्णधारपद काढून घेतले जाणार असून, त्याच्या जागी श्रेयस अय्यरची (Shreyas Iyer) निवड केली जाणार आहे. एनडीटीव्ही या वेबसाइटने असे वृत्त दिले आहे. परंतु बीसीसीआयकडून अधिकृतपणे याबाबत काहीही जाहीर करण्यात आलेले नाही.

सूर्यकुमार यादवने टी-20 विश्वचषकचे विजेतेपद मिळवून दिले आहे. त्यानंतर टी-20 संघाच्या कर्णधारपदावरून त्याला हटवले जाण्याची शक्यता आहे. बीसीसीआयच्या सूत्रांनी एनडीटीव्हीला दुजोरा दिला आहे. अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समिती कर्णधार बदलणार आहे. आयपीएल 2026 मध्ये पंजाब किंग्स (पीबीकेएस) संघाचे कर्णधारपद भूषवलेल्या श्रेयस अय्यरच्या कामगिरीने प्रभावित झालेले आहे. त्याला भारताचा नवीन टी-20 कर्णधार म्हणून निवडण्याचा विचार करत आहेत. आयपीएलनंतर भारतीय संघ आयर्लंड आणि इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यासाठी बीसीसीआय भारताच्या टी-20 संघात युवा प्रतिभावंतांना संधी देण्याचाही विचार करत आहे. सध्या सूर्यकुमार यादव खराब फॉर्ममध्ये आहे, त्यामुळे त्याचे कर्णधारपद काढून घेतले जाणार आहे. श्रेयस अय्यर नवीन कर्णधार होण्याच्या शर्यतीत आघाडीवर आहे. तर सूर्यकुमारचा आयपीएलमधील खराब फॉर्म पाहता, फलंदाज म्हणून संघात स्थान मिळेल की नाही यावर मोठे प्रश्नचिन्ह आहे.

आंतरराष्ट्रीय सामन्यात सूर्यकुमार यादव चांगली फलंदाज करतो. परंतु काही महिन्यांपासून धावांसाठी तो संघर्ष करत आहे. यंदाच्या आयपीएलच्या हंगामात मुंबई इंडियन्सकडून खेळताना सूर्यकुमार यादव अपयशी ठरला आहे. त्याचा फटका मुंबई इंडियन्सला बसला आहे. त्याने दहा सामन्यात केवळ 195 धावा केल्या आहेत. गेल्या काही काळांपासून सूर्यकुमार हा मनगटाच्या दुखापतीमुळे त्रस्त आहेत. त्यामुळे त्याचा खेळ सुधरत नसल्याचे बीसीसीआय आणि टीम इंडियाच्या सुत्रांनी सांगितले आहे.

श्रेयस अय्यर जबरदस्त फॉर्ममध्ये
दुसरीकडे श्रेयस अय्यरने पंजाब किंग्सला सहा सामने जिंकून दिले आहेत. त्याने नऊ सामन्यांमध्ये 333 धावा ठोकल्या आहेत. रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर भारताचे कर्णधारपद स्वीकारल्यापासून सूर्यकुमारने अद्याप एकही टी-२० आंतरराष्ट्रीय मालिका गमावलेली नाही. दुसरीकडे श्रेयस गेल्या दोन वर्षांहून अधिक काळात एकही टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. त्याचा शेवटचा सामना डिसेंबर 2023 मध्ये झाला होता.

follow us