Jasprit Bumrah : भारताला मोठा धक्का; जसप्रीत बुमराह श्रीलंका मालिकेतून बाहेर
Jasprit Bumrah : श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत
Jasprit Bumrah : श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह या मालिकेतून बाहेर झाला आहे. बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, गुडघ्याच्या समस्येमुळे या मालिकेतून जसप्रीत बुमराह बाहेर झाला आहे. बीसीसीआयच्या ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ (CoE) मध्ये प्राथमिक तपासणीनंतर बुमराहला पूर्णपणे तंदुरुस्त होण्यावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
श्रीलंकेतील दोन सामन्यांची कसोटी मालिका 15 ऑगस्टपासून सुरू होणार असून, पहिला सामना गॅले येथे आणि दुसरा सामना कोलंबो येथे खेळवला जाणार आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार, टी20 विश्वचषकानंतर गुडघ्याची समस्या बळावल्यामुळे बीसीसीआयच्या (BCCI) वैद्यकीय पथकाने बुमराहला या आठवड्याच्या सुरुवातीला इंजेक्शन घेण्याचा सल्ला दिला होता. बुमराहने (Jasprit Bumrah) वेळेनुसार गेल्या महिन्यात ते इंजेक्शन घेतले होते. मात्र, त्याच्या प्रकृतीत सुधारणा होण्यास सुरुवातीला अपेक्षा होती त्यापेक्षा जास्त वेळ लागत आहे.
कोलंबोतील दुसऱ्या कसोटी सामन्यापर्यंत त्याला तंदुरुस्त करण्याबाबत चर्चा झाली असली, तरी ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’चे वैद्यकीय पथक कोणताही धोका पत्करायला तयार नाही.
टीम इंडियाचा श्रीलंका दौरा
3-दिवसीय सराव सामना: 7-9 ऑगस्ट (एनसीसी मैदान, कोलंबो)
पहिली कसोटी: 15 ऑगस्टपासून सुरुवात (गाले आंतरराष्ट्रीय स्टेडियम)
दुसरी कसोटी: 23 ऑगस्टपासून सुरुवात (एसएससी स्टेडियम, कोलंबो)
शानदार, जबरदस्त, भारताने एका दिवशी पटकावली 16 पदके; बॉक्सिंगमध्ये 7 सुवर्णपदके
श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघ:
शुभमन गिल (कर्णधार), के.एल. राहुल (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), साई सुदर्शन, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मानव सुथार, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, गुरनूर ब्रार, देवदत्त पडिक्कल, सारांश जैन.