CWG 2026 : शानदार, जबरदस्त, भारताने एका दिवशी पटकावली 16 पदके; बॉक्सिंगमध्ये 7 सुवर्णपदके
CWG 2026 : ग्लासगो येथे सुरु असणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने नवीन इतिहास रचला आहे. या स्पर्धेच्या दहाव्या दिवशी भारताने तब्बल 16
CWG 2026 : ग्लासगो येथे सुरु असणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने नवीन इतिहास रचला आहे. या स्पर्धेच्या दहाव्या दिवशी भारताने तब्बल 16 पदके जिंकली आहे. एकाच दिवशी तब्बल 16 पदके जिंकून भारत आता एकूण पदकांच्या तालिकेत 39 पदकांसह चौथ्या स्थानावर पोहचला आहे. भारताने या दिवशी 8 सुवर्ण, 5 रौप्य आणि 3 कांस्य पदके जिंकली आहे. यात बॉक्सिंगमधूनच 7 सुवर्णपदके भारताला मिळाली आहे.
बॉक्सर प्रीती पवार (Preeti Pawar), जस्मिन लंबोरिया (Jasmine Lamboria) , साक्षी चौधरी, प्रिया घांघस, अरुंधती चौधरी, सचिन सिवाच आणि अंकुश पांघल यांनी सुवर्णपदके जिंकली, तर जादुमणी सिंग, लोव्हलिना बोर्गोहेन (Lovlina Borgohain) आणि नरेंद्र बेरवाल यांनी रौप्यपदके पटकावली. तर पुरुषांच्या 5000 मीटर शर्यतीच्या अंतिम फेरीत गुलवीर सिंग याने कांस्यपदक जिंकले. पुरुषांच्या F57 शॉट पुट प्रकारात भारताने पहिले आणि दुसरे स्थान (1-2 फिनिश) पटकावले. यात सोमण राणाने सुवर्ण आणि शुभम जुयालने रौप्यपदक जिंकले. पुरुषांच्या ट्रिपल जंप प्रकारात प्रवीण चित्रवेलने रौप्य, तर सेल्वा प्रभू तिरुमारनने कांस्यपदक जिंकले. ज्युडोपटू उन्नती शर्मा हिनेही कांस्यपदक जिंकले. आता भारताची एकूण पदकांची संख्या 39 (13 सुवर्ण, 17 रौप्य आणि नऊ कांस्य) झाली असून, पदक तालिकेत भारत चौथ्या स्थानावर आहे.
कॉमनवेल्थ गेम्सच्या 10 व्या दिवशी पदकं जिंकणारे भारतीय खेळाडू
सुवर्ण: प्रीती पवार – महिला 54 किलो (बॉक्सिंग)
सुवर्ण: जस्मिन लंबोरिया – महिला 57 किलो (बॉक्सिंग)
सुवर्ण: सोमन राणा – पुरुष शॉट पुट F57 (पॅरा-ॲथलेटिक्स)
सुवर्ण: साक्षी चौधरी – महिला 51 किलो (बॉक्सिंग)
सुवर्ण: प्रिया घांघस – महिला 60 किलो (बॉक्सिंग)
सुवर्ण: अरुंधती चौधरी – महिला 70 किलो (बॉक्सिंग)
सुवर्ण: सचिन सिवाच – पुरुष 60 किलो (बॉक्सिंग)
सुवर्ण: अंकुश पांघल – पुरुष 80 किलो (बॉक्सिंग)
रौप्य: प्रवीण चित्रवेल – पुरुष ट्रिपल जंप (ॲथलेटिक्स)
रौप्य: जादुमणी सिंग मंडेन्गबाम – पुरुष 55 किलो (बॉक्सिंग)
रौप्य: शुभम जुयाल – पुरुष शॉट पुट F57 (पॅरा-ॲथलेटिक्स)
रौप्य: लोव्हलिना बोर्गोहेन – महिला 75 किलो (बॉक्सिंग)
रौप्य: नरेंद्र बेरवाल – पुरुष +90 किलो (बॉक्सिंग)
कांस्य: सेल्वा प्रभू तिरुमारन – पुरुष ट्रिपल जंप (ॲथलेटिक्स)
कांस्य: उन्नती शर्मा – महिला -57 किलो (जुडो)
कांस्य: गुलवीर सिंग – पुरुष 5000 मीटर (ॲथलेटिक्स)
2026 च्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकणारे भारतीय खेळाडू
मीराबाई चानू – महिला 48 किलो (वेटलिफ्टिंग)
शर्मिला धनखर – महिला शॉट पुट F57 (पॅरा-ॲथलेटिक्स)
दिलीप महादू गावित – पुरुष 100 मीटर T47 (पॅरा-ॲथलेटिक्स)
अस्मिता डे – महिला -48 किलो (जुडो)
हर्ष सिंग – पुरुष -60 किलो (जुडो)
प्रीती पवार – महिला 54 किलो (बॉक्सिंग)
जस्मिन लंबोरिया – महिला 57 किलो (बॉक्सिंग)
सोमन राणा – पुरुष शॉट पुट F57 (पॅरा ॲथलेटिक्स)
साक्षी चौधरी – महिला 51 किलो (बॉक्सिंग)
प्रिया घांघस – महिला 60 किलो (बॉक्सिंग)
अरुंधती चौधरी – महिला 70 किलो (बॉक्सिंग)
सचिन सिवाच – पुरुष 60 किलो (बॉक्सिंग)
अंकुश पांघल – पुरुष 80 किलो (बॉक्सिंग)
2026 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक जिंकणारे भारतीय खेळाडू (17)
ऋषिकंत सिंग – पुरुष 60 किलो (वेटलिफ्टिंग)
मुथुपंडी राजा – पुरुष 65 किलो (वेटलिफ्टिंग)
ज्ञानेश्वरी यादव – महिला 53 किलो (वेटलिफ्टिंग)
वल्लुरी अजय बाबू – पुरुष 79 किलो (वेटलिफ्टिंग)
हरजिंदर कौर – महिला 69 किलो (वेटलिफ्टिंग)
सर्वेश कुशारे – पुरुष उंच उडी (ॲथलेटिक्स)
गुलवीर सिंग – पुरुष 10,000 मीटर (ॲथलेटिक्स)
एम. श्रीशंकर – पुरुष लांब उडी (ॲथलेटिक्स)
मोहम्मद बासिल – पुरुष 100 मीटर T47 (पॅरा ॲथलेटिक्स)
लव्हप्रीत सिंग – पुरुष +110 किलो (वेटलिफ्टिंग)
यामिनी मौर्य – महिला -57 किलो (जुडो)
नीरज चोप्रा – पुरुष भालाफेक (ॲथलेटिक्स)
प्रवीण चित्रवेल – पुरुष तिहेरी उडी (ॲथलेटिक्स)
जादुमणी सिंग मंडेन्गबाम – पुरुष 55 किलो (बॉक्सिंग)
शुभम जुयाल – पुरुष गोळाफेक F57 (पॅरा ॲथलेटिक्स)
लव्हलिना बोर्गोहेन – महिला 75 किलो (बॉक्सिंग)
नरेंद्र बेरवाल – पुरुष +90 किलो (बॉक्सिंग)
राज्यात 4 ऑगस्टपर्यंत मुसळधार पाऊस; पुणेसह ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी –