मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नमित मल्होत्रा यांच्या ‘प्राइम फोकस स्टुडिओज फेज 1’चे भव्य उद्घाटन

महत्त्वाचा टप्पा गाठत निर्माता नमित मल्होत्रा यांनी अधिकृतपणे प्राइम वन, अर्थात प्राइम फोकस स्टुडिओजच्या पहिल्या टप्प्याची, सुरुवात केली.

  • Vishal Aarde
  • Written By: Published:
Untitled Design   2026 08 06T210535.340

Grand Inauguration of ‘Prime Focus Studios Phase 1’ : यंदाच्या वर्षातील मनोरंजन क्षेत्रातील सर्वात महत्त्वाच्या घडामोडींंपैकी एक म्हणून नमित मल्होत्रा यांच्या प्राइम फोकस स्टुडिओज फेज 1 चे आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. मुंबईतील फिल्म सिटीमध्ये उभारलेल्या या कॅम्पसमध्ये क्रिएटिव्ह आणि टेक्नॉलॉजी टीम्सना एकाच छताखाली आणण्यात आले असून, मीडिया आणि मनोरंजन क्षेत्राच्या भविष्यातील गरजा लक्षात घेऊन त्याची उभारणी करण्यात आली आहे.

आपल्या प्रवासातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठत निर्माता नमित मल्होत्रा यांनी अधिकृतपणे प्राइम वन, अर्थात प्राइम फोकस स्टुडिओजच्या पहिल्या टप्प्याची, सुरुवात केली. याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी नमित मल्होत्रा यांनी उपस्थितांना संबोधित करत ‘रामायणम्’साठी अकादमी पुरस्कार भारतात आणण्याचे आपले स्वप्न आणि व्हिजनही मांडले.

WAVES Summit दरम्यान प्राइम फोकस आणि महाराष्ट्र सरकार यांनी मुंबईत भारताच्या चित्रपटसृष्टीच्या केंद्रस्थानी जागतिक दर्जाची एंटरटेनमेंट इकोसिस्टम उभारण्याची घोषणा केली होती. आता ते स्वप्न प्रत्यक्षात उतरले आहे. कंपनीचे जागतिक मुख्यालय म्हणून प्राइम वन मुंबईमध्ये प्राइम फोकस परिवारातील 1,000 हून अधिक सदस्यांना एकत्र आणते, तर जगभरातील 10,000 पेक्षा अधिक कर्मचारी कंपनीच्या जागतिक कामकाजाचा भाग आहेत.

मी डोळे झाकून जेन-झीवर विश्वास ठेवेन; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नव्या पिढीबद्दल मोठे वक्तव्य

नमित मल्होत्रा यांनी प्राइम फोकसअंतर्गत कार्यरत असलेल्या त्यांच्या व्हिज्युअल इफेक्ट्स कंपनी DNEGच्या माध्यमातून जागतिक स्तरावर विशेष ओळख निर्माण केली आहे. सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्ससाठी DNEG ला आतापर्यंत तब्बल 8 अकादमी पुरस्कार (ऑस्कर) मिळाले आहेत. ‘Dune: Part Two’, ‘Dune’ आणि ‘Tenet’ यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये कंपनीने उत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्सचे काम केले आहे.

याशिवाय नमित मल्होत्रा यांची DNEG, यश यांच्या Monster Mind Creations सोबत मिळून भारतातील सर्वात भव्य चित्रपटांपैकी एक असलेला ‘रामायणम्’ प्रेक्षकांसमोर घेऊन येत आहे. या चित्रपटात रणबीर कपूर, साई पल्लवी आणि यश प्रमुख भूमिकांमध्ये दिसणार आहेत. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होताच भारतभर मोठी चर्चा रंगली होती. तसेच, भारताच्या या महान महाकाव्याची कथा जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचावी यासाठी त्याची इंग्रजी लिप-सिंक्ड आवृत्ती देखील प्रदर्शित करण्यात आली आहे.

follow us