Download App

IND vs BAN : टीम इंडिया सावधान! बांग्लादेशचे ‘हे’ पाच खेळाडू उलटफेर करण्यात माहीर; यादीच पाहा..

भारत आणि बांग्लादेश यांच्यात लढत होणार आहे. टीम इंडियाचा हा पहिलाच सामना आहे. गुरुवारी दुपारपासून सामना सुरू होणार आहे.

IND vs BAN, Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा पाकिस्तानात सुरू झाली आहे. या स्पर्धेतील (Champions Trophy 2025) पहिल्याच सामन्यात काल न्यूझीलंडने पाकिस्तानचा दणदणीत (IND vs BAN0) पराभव केला. या पराभवामुळे पाकिस्तान थेट स्पर्धेतूनच बाहेर फेकला जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे याच गटातील भारत आणि बांग्लादेश यांच्यात लढत होणार आहे. टीम इंडियाचा  (Team India) हा पहिलाच सामना आहे. आज दुपारी 2.30 वाजल्यापासून सामना सुरू होणार आहे.

बांग्लादेश विरुद्ध भारताचे (India vs Bangladesh) पारडे नेहमीच जड राहिले आहे. पण उलटफेर करण्यात बांग्लादेश माहीर आहे. मागील पाच एकदिवसीय सामन्यांत बांग्लादेश भारताला वरचढ ठरला आहे. या संघातील पाच खेळाडू असे आहेत जे भारतीय संघासाठी डोकेदुखी ठरू शकतात. हे खेळाडू कोण आहेत, त्यांची कामगिरी कशी आहे याची माहिती घेऊ.

मुस्ताफिजूर रहमान

बांग्लादेशचा वेगवान गोलंदाज मुस्ताफिजूर रहमान भारतीय फलंदाजांच्या अडचणी वाढवू शकतो. टीम इंडिया विरुद्ध त्याची कामगिरी चांगली राहिलेली आहे. मुस्ताफिजूर रहमान नव्या चेंडूने स्विंग आणि जुन्या चेंडूने स्लोअर टाकण्यात तरबेज आहे. त्यामुळे या गोलंदाजाविरुद्ध टीम इंडियाच्या फलंदाजनांना सावधपणे खेळावे लागणार आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये न्युझीलँडची विजयी सलामी! होम ग्राउंडवर पाकिस्तानला चारली पराभवाची धूळ

मेहदी हसन मिराज

दोन वर्षांपूर्वी मेहदी हसन मिराजने भारताविरुद्ध शानदार कामगिरी केली होती. या सामन्यात आठव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येत त्याने शतक केले होते. या सामन्यात भारतीय संघाचा पराभव झाला होता. मागील पाच सामन्यात बांग्लादेशने तीनदा भारताचा पराभव केला आहे. मेहदी हसन मिराज फलंदाजीबरोबरच फिरकी गोलंदाजी करण्यात माहीर आहे.

तस्कीन अहमद

तस्कीन अहमद त्याच्या वेगासह नव्या चेंडूने स्विंग करण्याची क्षमता राखतो. एकदिवसीय फॉरमॅटमध्ये आतापर्यंत त्याने 77 सामन्यांत 109 विकेट्स घेतल्या आहेत. भारतीय संघाविरुद्ध त्याची कामगिरी चांगलीच राहिली आहे. अनेक सामने त्याने जिंकून दिले आहेत. त्यामुळे भारताच्या सलामीच्या फलंदाजांनी तस्कीनपासून सावध राहावे लागणार आहे.

मुश्फिकूर रहीम

मुश्फिकूर रहीम बांग्लादेश संघातील सर्वात अनुभवी खेळाडू आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 15 वर्षांचा अनुभव त्याच्याकडे आहे. भारताविरुद्ध त्याचे प्रदर्शन चांगले राहिले आहे. एकदिवसीय सामन्यांत त्याची कामगिरी चांगली असते. त्यामुळे भारतीय खेळाडूंना मुश्फिकूरपासून सावध राहावे लागणार आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी टीम इंडियाची नवी जर्सी; ‘पाकिस्तान’चे नाव; पाहा संपूर्ण खेळाडूंचे फोटो

नजमूल हसन शांतो

बांग्लादेशचा कर्णधार नजमूल हसन शांतो आघाडीच्या फलंदाजांत गणला जातो. आताही तो चांगल्या फॉर्ममध्ये आहे. आपल्या फलंदाजीच्या जोरावर एकहाती सामना फिरवण्याची क्षमता त्याच्यात आहे. त्यामुळे भारतीय खेळाडूंना मुश्फिकूरपासून सावध राहावे लागणार आहे.

follow us