IND vs WI : दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियम येथे सुरु असणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने शानदार गोलंदाजी करत वेस्ट इंडिजचा पहिला डाव 248 धावांवर संपावला. या सामन्यात पहिल्या डावात भारतीय संघाने 5 बाद 518 धावा केल्या होत्या. भारतीय संघाने 270 धावांची आघाडी मिळवली असून वेस्ट इंडिजला फॉलो-ऑन देण्यात आले आहे. भारताकडून कुलदीप यादवने शानदार गोलंदाजी करत पाच विकेट्स घेतल्या.
या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी वेस्ट इंडिजने 4 बाद 140 धावांवर (IND vs WI) खेळ सुरु केला होता मात्र कुलदीप यादवने (Kuldeep Yadav) शानदार गोलंदाजी करत वेस्ट इंडिज संघाला बॅकफूटवर नेले. पहिल्या डावात वेस्ट इंडिजकडून अॅलिक अथानाझेने सर्वाधिक 41 धावा केल्या. शाई होपनेही 36 धावा केल्या. भारताकडून कुलदीप यादवने पाच विकेट्स घेतले तर रवींद्र जडेजाने तीन, तर मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
पहिल्या डावात 518 धावा केल्यानंतर भारतीय संघाने दुसऱ्या दिवशी आपला डाव घोषित केला. पहिल्या डावात टीम इंडियाकडून यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) आणि कर्णधार शुभमन गिल (Shubman Gill) यांनी शानदार शतके झळकावली. जयस्वालने 175 धावा केल्या, तर गिलने नाबाद 129 धावा केल्या.
जमिनीतून गुप्तधन काढून देतो असे सांगत 1 कोटी 87 लाखांची फसवणूक; भोंदू बाबाला अटक
𝙄𝙣𝙣𝙞𝙣𝙜𝙨 𝘽𝙧𝙚𝙖𝙠!
5⃣ wickets for Kuldeep Yadav
3⃣ wickets for Ravindra Jadeja
1⃣ wicket each for Mohd. Siraj and Jasprit Bumrah #TeamIndia lead by 270 runs and have enforced the follow-on 👍Scorecard ▶ https://t.co/GYLslRzj4G#INDvWI | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/qEIjD4t2OT
— BCCI (@BCCI) October 12, 2025