Download App

आधी भारत जिंकला, नंतर दगडफेक अन् निकालच बदलला; बांग्लादेशविरुद्धच्या सामन्यात काय घडलं?

SAFE U19 Women’s Championship :  बांग्लादेशातील ढाका येथे झालेल्या सैफ महिला अंडर 19 फुटबॉल चॅम्पियनशीप स्पर्धेत (SAFE U19 Women’s Championship) हायहोल्टेज ड्रामा पाहण्यास मिळाला. या सामन्यात आधी भारताला (India vs Bangladesh) विजयी घोषित करण्यात आले होते. नंतर मात्र भारत आणि बांग्लादेशला संयुक्त विजेता घोषित करण्यात आले. सामन्यासाठीच्या निर्धारीत 90 मिनिटांच्या कालावधीत सामना 1-1 असा बरोबरीत होता. त्यानंतर पेनल्टी शूटआउटचा निर्णय घेण्यात आला. येथेही दोन्ही संघांचा स्कोर बरोबरीत राहिला. यानंतर नाणेफेकीच्या माध्यमातून भारताला विजयी घोषित करण्यात आले. हा निर्णय बांग्लादेशी खेळाडू आणि चाहत्यांच्या पचनी पडला नाही. तीव्र विरोधानंतर अधिकाऱ्यांनी निकाल बदलत दोन्ही संघांना संयुक्त विजयी घोषित करण्यात आले.

Bangladesh Train : मतदानाआधीच हिंसा! बांग्लादेशात रेल्वेला लागलेल्या आगीत 5 जणांचा मृत्यू

या सामन्यात भारताकडून सिबानी देवीने आठव्या तर बांग्लादेशसाठी मोसम्मत सगोरिकाने इंजरी टाइममध्ये (90+3 मिनिट) गोल केला. यामुळे सामन्यात पेनल्टी शूटआउटचा निर्णय घ्यावा लागला. गोलकीपरसह दोन्ही संघांचे सर्व 11 खेळाडूंनी आपल्या पेनल्टी किकवर गोल केले. स्कोर 11-11 झाल्यानंतर मॅच रेफरीकडून पेनल्टी शूटआउट कायम ठेवले जाणार होते मात्र त्यांना नकार देण्यात आला. दोन्ही संघांच्या कर्णधारांना बोलावून नाणेफेक करण्यात आली. यात भारत लकी ठरला आणि विजयाचा जल्लोष सुरू करण्यात आला.

यानंतर भारतीय खेळाडू मैदानातून बाहेर पडले. बांग्लादेशच्या खेळाडूंनी मात्र विरोध करण्यास सुरुवात केली आणि बराच वेळ मैदानातच राहिले. पेनल्टी शूटआउट पुन्हा सुरू करावा अशी मागणी या खेळाडूंची होती. या दरम्यान प्रेक्षकही मैदानात बाटल्या फेकत होते. काही जणांनी तर दगडही फेकले. घोषणाबाजीही केली. यामुळे सगळीकडेच धावपळ सुरू झाली.

Bangladesh Bus Accident : प्रवाशांनी खचाखच भरलेली बस तलावात कोसळली; 17 जणांचा जागीच मृत्यू

परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे दिसून येताच पोलिसांनी हस्तक्षेप केला. जवळपास तासभर हा गदारोळ सुरु होता. यानंतर मात्र अधिकाऱ्यांना त्यांचा निर्णय बदलावा लागला. नाणेफेकीचा निर्णय रद्द करत भारत आणि बांग्लादेशला महिला अंडर 19 सैफ फुटबॉल चॅम्पियनशीप स्पर्धेचे संयुक्त विजेते घोषित करण्यात आले.

follow us