Bangladesh Bus Accident : प्रवाशांनी खचाखच भरलेली बस तलावात कोसळली; 17 जणांचा जागीच मृत्यू

Bangladesh Bus Accident : प्रवाशांनी खचाखच भरलेली बस तलावात कोसळली; 17 जणांचा जागीच मृत्यू

Bangladesh Bus Accident : भारताशेजारील बांग्लादेशात भीषण अपघात घडल्याची बातमी आली आहे. प्रवाशांनी भरलेली बस तलावात पडल्याने तीन मुलांसह 17 जणांचा मृत्यू झाला तर या 35 जण जखमी झाले आहेत. एएनआय वृत्तसंस्थेने बांग्लादेशी वृत्तपत्र डेली स्टारच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. अपघात कशामुळे घडला याचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.

याबाबत आधिक माहिती अशी, या अपघात जे लोक वाचले त्यांनी या घटनेसाठी बसचालकाला दोषी धरले. बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसविण्यात आल्याने हा अपघात घडल्याचे सांगितले. डेली स्टारच्य मते, 52 लोकांची क्षमता या बसची होती. मात्र प्रत्यक्षात बसमध्ये 60 पेक्षा जास्त प्रवासी बसलेले होते. पिरोजपूर येथील भंडारिया येथून सकाळी 9 वाजता निघालेली बस बारिशान-खुलना महामार्गावरील छत्रकांडा येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या तलावात ही बस कोसळली.

या भीषण अपघातात 17 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर जे प्रवासी जखमी झाले त्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती स्थानिक प्रशासनाने दिली.

देशात रस्ते अपघातांचे प्रमाण जास्त आहे. रोड सेफ्टी फाउंडेशनच्या मते एकट्या जून महिन्यात एकूण 559 रस्ते अपघात झाले आहेत. या अपघातात 562 लोकांना जीव गमवावा लागला तर 812 लोक जखमी झाले. या देशात वाहतुकीचीही मोठी समस्या आहे. अरुंद रस्ते,  रस्त्याच्या कडेला असलेली अतिक्रमणे, वाहनांची वाढती संख्या, वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याकडे दुर्लक्ष या काही कारणांमुळे बांग्लादेशात रस्ते अपघातांची संख्या वाढली आहे.  तसे पाहिले तर दक्षिण आशियाई देशात वाहतुकीच्या समस्या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत.

कॅनडामध्ये 15 भारतीय वंशाच्या लोकांना अटक, 9 दशलक्ष डॉलर्सची मालमत्ता जप्त

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube