मुंबई : टीम इंडियाचे (Indian Cricket team)माजी क्रिकेटपटू सलीम दुर्राणी (Salim Durani)यांचं निधन झालं आहे. (Salim Durani Passes Away) त्यांनी वयाच्या 88 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. अफगानिस्तानमधून (Afghanistan)येऊन भारताकडून क्रिकेट खेळणारे सलीम दुर्राणी यांनी जगाचा निरोप घेतला आहे. आज गुजरातमधील (Gujrat)जामनगर येथे निधन झालं आहे. सलीम दुर्राणी हे पहिले भारतीय क्रिकेटपटू होते, ज्यांना अर्जुन पुरस्काराने (Arjuna Award)गौरवण्यात आले होते.
‘अमृता’ नाव लकी, अमोल कोल्हे करणार अमृता खानविलकरसोबत लग्न? कोल्हेंनी शेअर केली पोस्ट
सलीम दुर्राणी यांनी भारतीय संघासाठी एकूण 29 सामने खेळले, त्यामध्ये त्यांनी 1202 धावा केल्या. या धावांमध्ये एक शतक आणि सात अर्धशतकांचा समावेश आहे. त्याचबरोबर त्यांनी 75 विकेटदेखील घेतल्या. अफगानिस्तानमधून आल्यानंतर भारतीय क्रिकेट संघात सहभागी होऊन नाव कमावणारे फिरकीपटू असलेले अष्टपैलू दुर्राणींचा जन्म 11 डिसेंबर 1934 रोजी झाला.
त्यांचा जन्म अफगाणिस्तानची राजधानी काबूल येथे झाला होता. काही काळानंतर दुर्राणी यांचं कुटूंब पाकिस्तानमधील कराचीला गेले अन् स्थायिक झाले. पुढे भारत-पाकिस्तानच्या फाळणीनंतर दुर्राणी कुटूंब भारतात आले. त्यानंतर ते भारतातच लहानाचे मोठे झाले. पुढे ते भारताच्या क्रिकेट टीममध्ये सहभागी झाले.
दुर्राणी यांच्या निधनाने भारतीयांवर शोककळा पसरली आहे. ते अनेक दिवसांपासून कर्करोगाशी झुंज देत होते. आता मात्र त्यांची कर्करोगाशी झुंज अयशस्वी ठरली आहे. त्यांनी वयाच्या 88 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. सलीम दुर्राणी अर्जुन पुरस्कार मिळवणारे पहिले क्रिकेटपटू आहेत. 1960 मध्ये त्यांना क्रीडा जगतातील हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.