Download App

Hockey World Cup 2023: जर्मनी हॉकीचा विश्वविजेता

भुवनेश्वर : अटीतटीच्या हॉकी विश्वचषकात सामन्यात जर्मनीनं अखेर पेनल्टी शूटआऊटमध्ये बेल्जियमला 5-4 च्या फरकाने मात दिली.जर्मनीनं विश्वचषकावर नाव कोरलं आहे.

भारतात संपन्न झालेल्या हॉकी विश्वचषकात (Hockey World Cup 2023) आज अंतिम सामना जर्मनी आणि बेल्जियम यांच्यात झाला

जर्मनी आणि बेल्जियम या दोन्ही संघानी स्पर्धेत सुरुवातीपासून दमदार कामगिरी करत फायनल गाठली होती. त्यामुळेच फायनलचा सामनाही अगदी अटीतटीचा झाला. भुवनेश्वरमध्ये खेळल्या गेलेल्या आजच्या अंतिम सामन्यात चमकदार कामगिरी करत जर्मनीनं तिसऱ्यांदा विश्वचषक जिंकला आहे.

दरम्यान, भारतीय संघ क्रॉसओव्हर सामन्यात न्यूझीलंडकडून (India vs New Zealand) पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभूत होऊन स्पर्धबाहेर झाला होता. पण वर्गीकरण सामन्यात (Classification Matches) भारताने चांगली कामगिरी करत 9 व्या स्थानावर स्पर्धा संपवली.

फायनलचा सामना अतिशय रोमांचक झाला, फुल टाईमपर्यंत दोन्ही संघांनी प्रत्येकी 3-3 गोल करत सामन्यात बरोबरी साधली होती. त्यानंतर विजेता कोण? हे ठरवण्यासाठी पेनल्टी शूटआऊट घेण्यात आलं. पेनल्टी शूटआऊटमध्ये जर्मनीने बेल्जियमचा 5-4 अशा फरकाने पराभव करत आपला विजय पक्का केला आणि सोबतच विश्वचषकाची ट्रॉफी देखील उंचावली

Tags

follow us