IPL 2023 मध्ये गुजरात टायटन्सने आठवा विजय मिळवला आहे. 7 मे (रविवार) रोजी झालेल्या सामन्यात गुजरातने लखनौ सुपर जायंट्सचा 56 धावांनी पराभव केला. गुजरातने लखनौला विजयासाठी 228 धावांचे लक्ष्य दिले होते, परंतु ते सात विकेट्सवर 171 धावाच करू शकले. लखनौकडून क्विंटन डिकॉकने 70 धावांची खेळी केली, ती व्यर्थ गेली.
एका मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना लखनौ सुपर जायंट्सने जोरदार सुरुवात केली. काईल मेयर्स आणि क्विंटन डिकॉक यांनी पहिल्या विकेटसाठी 8.2 षटकात 88 धावांची भागीदारी केली. मोहित शर्माने मेयर्सला बाद करून ही भागीदारी संपुष्टात आणली. मेयर्सने 32 चेंडूंत 7 चौकार आणि दोन षटकारांसह 48 धावा केल्या. मेयर्स बाद झाल्यानंतर लखनऊचा डाव रुळावरून घसरला आणि त्यांनी सतत विकेट गमावल्या, त्यामुळे ते लक्ष्यापासून दूर राहिले.
लखनऊ सुपर जायंट्ससाठी क्विंटन डिकॉकने 41 चेंडूत 70 धावा केल्या, ज्यात सात चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता. आयुष बडोनीनेही 21 धावा करत पराभवाचे अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला. गुजरात टायटन्ससाठी वेगवान गोलंदाज मोहित शर्माने सर्वाधिक चार खेळाडूंना बाद केले. तर नूर अहमद, राशिद खान आणि मोहम्मद शमी यांना प्रत्येकी एक यश मिळाले.
सीमाभागातील जनतेला सोडून दोन मंत्री कोणत्या बिळात लपले? राऊतांची सत्ताधाऱ्यांवर टीका
तत्पूर्वी गुजरातच्या सलामीवीर शुभमन गिलने 51 चेंडूत 94 धावांची खेळी केली. गिलने या काळात सात षटकार आणि दोन चौकार मारले. वृध्दिमान साहा 43 चेंडूत 81 धावा करून झेलबाद झाला. साहाच्या खेळीत 10 चौकार आणि चार षटकारांचा समावेश होता. आवेश खानने साहाला आपला बळी बनवले. साहा आणि गिलने झंझावाती पद्धतीने अर्धशतके केली.
या वादळी खेळीदरम्यान साहाने 20 आणि गिलने 29 चेंडूत अर्धशतके ठोकले. या दोघांनी लखनौच्या गोलंदाजांची धुलाई करताना 74 चेंडूत 142 धावांची सलामी दिली. लखनौकडून मोहसीन खान आणि आवेश खान यांनी 1-1 विकेट घेतली.