GT vs MI Qualifier 2: इंडियन प्रीमियर लीग 2023 च्या दुसऱ्या क्वालिफायरमध्ये आज (26 मे) गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना होणार आहे. उभय संघांमधील हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. हा सामना गुजरात आणि मुंबईसाठी करो या मरो असा आहे. सामना जिंकणारा संघ थेट अंतिम फेरीत प्रवेश करेल. गतविजेत्या गुजरात टायटन्सचे लक्ष्य हा सामना जिंकून अंतिम फेरीत प्रवेश करण्याचे असेल. त्याचवेळी, रोहित शर्माला आयपीएलचे सहावे विजेतेपद पटकावण्यासाठी मुंबई इंडियन्सला अंतिम फेरी गाठण्याची इच्छा आहे. या सामन्यात मुंबईचा गोलंदाज आकाश मधवाल गुजरातसाठी मोठे आव्हान ठरू शकतो.
आकाशची सर्वोत्तम गोलंदाजीची सरासरी
100 चेंडूंचे आकडे पाहिल्यास, मुंबई इंडियन्सचा मध्यमगती गोलंदाज आकाश मधवालची आयपीएल 2023 मध्ये सर्वोत्तम गोलंदाजीची सरासरी आहे. या बाबतीत तो उर्वरित गोलंदाजांच्या तुलनेत अव्वल आहे. आकाशने आयपीएलच्या 16व्या हंगामात 12.85 च्या सरासरीने विकेट्स घेतल्या आहेत. या मोसमात त्याच्या आसपास एकही गोलंदाज नाही. दिल्ली कॅपिटल्सचा मिचेल मार्श 14.17 च्या सरासरीने दुसरा, गुजरात टायटन्सचा मोहित शर्मा 16.58 च्या सरासरीने तिसरा, गुजरात टायटन्सचा मोहम्मद शमी 17.38 च्या सरासरीने चौथा, गुजरातचा राशिद खान 19.00 च्या सरासरीने पाचव्या, मथिशा पाथिराना चेन्नई 19.24 च्या सरासरीने सहाव्या तर रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा मोहम्मद सिराज 19.74 च्या सरासरीने सातव्या क्रमांकावर आहे.
चेन्नईचे फायनलसाठी ‘घातक’ अस्त्र तयार, प्रत्येक मोठ्या सामन्यात दाखवतोय ताकद
कोण आहे आकाश मधवाल?
आकाश मधवाल हा उत्तराखंडमधील रुरकीचा आहे. तो मध्यमगती वेगवान गोलंदाज आहे. सूर्यकुमार यादवला दुखापत झाल्यानंतर त्याचा मुंबई संघात समावेश करण्यात आला होता. आयपीएल 2023 च्या लिलावात मुंबईने त्याला 20 लाख रुपयांना विकत घेतले. आकाशने यंदा आयपीएलमध्ये पदार्पण केले आहे. त्याने मुंबई इंडियन्सकडून आतापर्यंत 7 सामने खेळले असून त्यात त्याने 13 विकेट घेतल्या आहेत. लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या एलिमिनेटर सामन्यात त्याने 5 धावांत 5 बळी घेतले. एलिमिनेटर सामन्यात 5 बळी घेणारा तो पहिला गोलंदाज ठरला आहे.