IPL 2023, GT vs MI :गुजरात टायटन्सने पाडला धावांचा पाऊस, मुंबईला दिले भले मोठे आव्हान, शुभमन गिलने ठोकले धमाकेदार शतक

IPL 2023, GT vs MI : इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) 16 वा मोसमात . आज क्वालिफायर-2 सामना खेळला जात आहे, ज्यामध्ये मुंबई इंडियन्स (MI) आणि गुजरात टायटन्स (GT) आमनेसामने आहेत. अहमदाबादमध्ये हा सामना खेळला जात आहे. अहमदाबादमध्ये सामन्यापूर्वी मुसळधार पाऊस झाला, जो आता थांबला आहे. पावसामुळे सामना अर्धा तास उशिरा सुरू झाला. या सामन्यात मुंबई […]

1622061272_cricket

1622061272_cricket

IPL 2023, GT vs MI : इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) 16 वा मोसमात . आज क्वालिफायर-2 सामना खेळला जात आहे, ज्यामध्ये मुंबई इंडियन्स (MI) आणि गुजरात टायटन्स (GT) आमनेसामने आहेत. अहमदाबादमध्ये हा सामना खेळला जात आहे. अहमदाबादमध्ये सामन्यापूर्वी मुसळधार पाऊस झाला, जो आता थांबला आहे. पावसामुळे सामना अर्धा तास उशिरा सुरू झाला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या गुजरातची सुरुवात चांगली झाली होती. वृद्धिमान साहा आणि शुभमन गिल यांनी मिळून 6.2 षटकात ५४ धावांची तुफानी भागीदारी केली. फिरकीपटू पियुष चावलाने साहाला यष्टीचीत करून ही भागीदारी तोडली. साहाने तीन चौकारांच्या मदतीने 18 धावा केल्या. पहिली विकेट पडल्यानंतर शुभमन गिल आणि साई सुदर्शनने जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. यादरम्यान गिलने आपला उत्कृष्ट फॉर्म कायम ठेवत अवघ्या 49 चेंडूत आपले शतक पूर्ण केले.

चेन्नईचे फायनलसाठी ‘घातक’ अस्त्र तयार, प्रत्येक मोठ्या सामन्यात दाखवतोय ताकद

गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सला विजयासाठी 234 धावांचे लक्ष्य दिले होते. यादरम्यान शुभमन गिलने शानदार शतक झळकावले. त्याने 129 धावा केल्या. शुभमनच्या खेळीत 10 षटकार आणि 7 चौकारांचा समावेश होता. हार्दिक पांड्याने नाबाद 28 धावा केल्या. साई सुदर्शनने 43 धावांचे योगदान दिले. मुंबईकडून पियुष चावला आणि आकाश मधवाल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

Exit mobile version