Download App

हार्दिक गुजरातकडून अन् रोहित मुंबईकडूनच खेळणार! पहा रिलीज अन् रिटेन खेळाडूंची संपूर्ण यादी

मुंबई : यंदाच्या आयपीएल मोसमात ऑलराऊंडर हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्समधून (Mumbai Indians) तर रोहित शर्मा गुजरात टायटन्सकडून (Gujarat Titans खेळणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. कारण गुजरात टायटन्सनने हार्दिकला तर मुंबईने रोहित शर्माला रिटेन केले आहे याशिवाय चेन्नईन सुपर किंग्जनेही महेंद्रसिंह धोनीला रिटेन केले आहे.आज (२६ नोव्हेंबर) आयपीएलमधील सर्व १० संघांनी आपल्या रिलीज आणि रिटेन खेळाडूंची यादी जाहीर केली. (Gujarat Titans have retained Hardik Pandya while Mumbai Indians have retained Rohit Sharma)

कोणी कोणत्या खेळाडूला रिलीज केले?

चेन्नई सुपर किंग्ज :

चेन्नईने 8 खेळाडूंना रिलीज केले आहे. यात बेन स्टोक्स, ड्वेन प्रिटोरियस, अंबाती रायुडू, सिसांडा मगाला, काइल जेम्सन, भगत वर्मा, सेनापती आणि आकाश सिंग यांना रिलीज केले आहे.

दिल्ली कॅपिटल्स :

दिल्ली कॅपिटल्सने 11 खेळाडूंना रिलीज केले आहे. रिले रोशॉ, चेतन साकारिया, रोवमन पॉवेल, मनीष पांडे, फिल सॉल्ट, मुस्तफिजुर रहमान, कमलेश नागरकोटी, रिपल पटेल, सरफराज खान, अमान खान आणि प्रियम गर्ग हे खेळाडू आहेत.

गुजरात टायटन्स :

गुजरात टायटन्सने 8 खेळाडूंना रिलीज केले आहे. यश दयाल, केएस भरत, शिवम मावी, उर्विल पटेल, प्रदीप संगवान, ओडियन स्मिथ, अल्झारी जोसेफ आणि दासुन सनाका हे खेळाडू आहेत.

IND vs PAK : वर्ल्डकपनंतर पुन्हा भारत-पाक भिडणार; ‘या’ दिवशी होणार हायहोल्टेज सामना

मुंबई इंडियन्स :

मुंबई इंडियन्सने (MI) 11 खेळाडूंनाही रिलीज केले आहे. त्यात अर्शद खान, रमणदीप सिंग, हृतिक शौकीन, राघव गोयल, जोफ्रा आर्चर, ट्रिस्टन स्टब्स, डुआन जॅन्सन, झ्ये रिचर्डसन, रिले मेरेडिथ, ख्रिस जॉर्डन आणि संदीप वॉरियर यांचा समावेश आहे.

लखनौ सुपर जायंट्स :

केएल राहुलच्या नेतृत्वाखालील लखनौ सुपर जायंट्सने 8 खेळाडूंना रिलीज केले. यामध्ये जयदेव उनाडकट, डॅनियल सॅम्स, मनन वोहरा, स्वप्नील सिंग, करण शर्मा, अर्पित गुलेरिया, सूर्यांश शेडगे आणि करुण नायर यांचा समावेश आहे.

सनरायजर्स हैदराबाद :

सनरायझर्स हैदराबाद (SRH) संघाने 6 खेळाडूंना रिलीज केले आहे. हॅरी ब्रूक, समर्थ व्यास, कार्तिक त्यागी, विवरांत शर्मा, अकिल हुसेन आणि आदिल रशीद हे खेळाडू आहेत.

पंजाब किंग्ज :

शिखर धवनच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्जने पाच खेळाडूंना रिलीज केले आहे. भानुका राजपक्षे, मोहित राठी, बलतेज धांडा, राज अंगद बावा आणि शाहरुख खान हे खेळाडू आहेत.

राजस्थान रॉयल्स :

राजस्थान रॉयल्सनेही त्यांच्या नऊ खेळाडूंना रिलीज केले आहे. जो रूट, अब्दुल बासित, जेसन होल्डर, आकाश वशिष्ठ, कुलदीप यादव, ओबेद मॅकॉय, मुरुगन अश्विन, केसी करिअप्पा आणि केएम आसिफ हे खेळाडू आहेत. त्यापैकी रूट, होल्डर आणि मॅकॉय हे परदेशी खेळाडू आहेत.

कोलकाता नाईट रायडर्स :

कोलकाता नाईट रायडर्सने आतापर्यंत सर्वाधिक 12 खेळाडूंना रिलीज केले आहे. यामध्ये शाकिब अल हसन, लिटन दास, डेव्हिड वेस, जॉन्सन चार्ल्स, लॉकी फर्ग्युसन आणि टीम साऊदी या विदेशी खेळाडूंचा समावेश आहे. याशिवाय भारतीय खेळाडूंमध्ये आर्य देसाई, एन जगदीसन, मनदीप सिंग, कुलवंत खेजरोलिया, शार्दुल ठाकूर आणि उमेश यादव यांचा समावेश आहे.

Ind Vs Aus : भारताला 209 धावांचं आव्हान; जॉश इंग्लिश, स्मिथची बॅट तळपली

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर :

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (RCB) ने 11 खेळाडूंना रिलीज केले आहे. यामध्ये वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, जोश हेझलवूड, फिन ऍलन, मिचेल ब्रेसवेल, डेव्हिड विली, वेन पारनेल, सोनू यादव, अविनाश सिंग, सिद्धार्थ कौल आणि केदार जाधव यांचा समावेश आहे.

रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी पुढीलप्रमाणे :

चेन्नई सुपर किंग्ज :

महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), डेव्हॉन कॉनवे, रुतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे, शेख रशीद, रवींद्र जडेजा, मिचेल सँटनर, मोईन अली, शिवम दुबे, निशांत सिंधू, अजय मंडल, राजवर्धन हेंगगेकर, दीपक चहर, महिष तिक्षीना चौधरी, प्रशांत सौलंकी, सिमरजीत सिंग, तुषार देशपांडे आणि मथिशा पाथीराना.

दिल्ली कॅपिटल्स :

ऋषभ पंत, डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, अभिषेक पोरेल, अक्षर पटेल, ललित यादव, मिचेल मार्श, यश धुल, प्रवीण दुबे, विकी ओस्तवाल, एनरिक नोरखिया, कुलदीप यादव, लुंगी एनगिडी, खलील अहमद, इशांत शर्मा आणि मुकेश कुमार .

गुजरात टायटन्स :

डेव्हिड मिलर, शुभमन गिल, मॅथ्यू वेड, वृद्धिमान साहा, केन विल्यमसन, हार्दिक पंड्या, अभिनव मनोहर, साई सुदर्शन, दर्शन नळकांडे, विजय शंकर, जयंत यादव, राहुल तेवतिया, मोहम्मद शमी, नूर अहमद, साई किशोर, राशिद खान, जोशुआ लिटल आणि मोहित शर्मा.

मुंबई इंडियन्स :

रोहित शर्मा, देवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, इशान किशन, टिळक वर्मा, रमणदीप सिंग, टिम डेव्हिड, ट्रिस्टन स्टब्स, विष्णू विनोद, अर्जुन तेंडुलकर, जोफ्रा आर्चर, मोहम्मद अर्शद खान, कॅमेरॉन ग्रीन, शम्स मुल्लानी, नेहल वढेरा, दुआन जॉन्सन, रोमारियो शेफर्ड .

लखनौ सुपर जायंट्स :

केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक, निकोल्सन पूरन, आयुष बडोनी, काइल मेयर्स, मार्कस स्टॉइनिस, दीपक हुडा, देवदत्त पडिककल, रवी बिश्नोई, नवीन उल हक, कृणाल पंड्या, युधवीर सिंग, प्रेरक मंकड , यश ठाकूर, अमित मिश्रा, मार्क वुड, मयंक यादव आणि मोहसीन खान.

सनराजर्स हैदराबाद  :

अब्दुल समद, एडन मार्कराम, राहुल त्रिपाठी, ग्लेन फिलिप्स, हेनरिक क्लासेन, मयंक अग्रवाल, अनमोलप्रीत सिंग, उपेंद्र सिंग यादव, नितीश कुमार रेड्डी, शाहबाज अहमद, अभिषेक शर्मा, मार्को यान्सिन, वॉशिंग्टन सुंदर, सनवीर सिंग, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, मयंक मार्कंडे, उमरान मलिक, फजल उल हक फारुकी.

टीमला दोनवेळा वर्ल्ड चॅम्पियन बनविलेल्या खेळाडूवर ICC ची कारवाई; क्रिकेटपासून लांब रहावं लागणार!

पंजाब किंग्ज :

शिखर धवन (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, जितेश शर्मा, प्रभसिमरन सिंग, मॅथ्यू शॉर्ट, हरप्रीत भाटिया, अथर्व तायडे, ऋषी धवन, सॅम कुरान, सिकंदर रझा, लियाम लिव्हिंगस्टोन, गुरनूर सिंग ब्रार, शिवम सिंग, राहुल चहर, अर्शदीप सिंग, हरप्रीत ब्रार, विदावथ कावेरप्पा, कागिसो रबाडा आणि नॅथन एलिस.

राजस्थान रॉयल्स :

संजू सॅमसन (कर्णधार), जोस बटलर, शिमरॉन हेटमायर, यशस्वी जैस्वाल, ध्रुव जुरेल, रायन पराग, डोनोवन फरेरा, क्रुणाल राठौर, रविचंद्रन अश्विन, कुलदीप सेन, नवदीप सैनी, प्रसीद कृष्णा, संदीप शर्मा, ट्रेंट बोल्ट, युजवेंद्र चहल , अॅडम झम्पा आणि आवेश खान.

कोलकाता नाईट रायडर्स :

नितीश राणा, रिंकू सिंग, रहमानउल्ला गुरबाज, श्रेयस अय्यर, जेसन रॉय, सुनील नरेन, सुयश शर्मा, अनुकुल रॉय, आंद्रे रसेल, व्यंकटेश अय्यर, हर्षित राणा, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती.

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर :

फाफ डू प्लेसिस (कर्णधार), अनुज रावत, दिनेश कार्तिक, विराट कोहली, रजत पाटीदार, आकाशदीप, महिपाल लोमरोर, मनोज भंडागे, ग्लेन मॅक्सवेल, सुयश प्रभुदेसाई, शाहबाज अहमद, विल जॅक, मोहम्मद सिराज, राजन शर्मा, कर्णधार , हिमांशू शर्मा, विजयकुमार वैशाख आणि रीस टोपले.

Tags

follow us