Download App

GT vs LSG : गिल-साहाने घेतला गोलंदाजांचा क्लास, गुजरातचे लखनौसमोर 228 धावांचे मोठे लक्ष्य

  • Written By: Last Updated:

इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 सीझनमध्ये सध्या गतविजेते गुजरात टायटन्स (GT) आणि लखनौ सुपर जायंट्स (LSG) यांच्यात सामना खेळला जात आहे. अहमदाबाद येथे खेळल्या जात असलेल्या या सामन्यात लखनौचा कर्णधार कृणाल पंड्याने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर गुजरात संघाने 2 गडी गमावून 227 धावा केल्या.

गुजरातकडून सलामीवीर शुभमन गिलने 51 चेंडूत 94 धावांची खेळी केली. वृध्दिमान साहा 43 चेंडूत 81 धावा करून झेलबाद झाला. आवेश खानने त्याला शिकार बनवले. साहा आणि गिलने झंझावाती पद्धतीने अर्धशतके झळकावली .

साहाने 20 आणि गिलने 29 चेंडूत अर्धशतक ठोकले. या दोघांनी लखनौच्या गोलंदाजांची धुलाई करताना ७४ चेंडूत 142 धावांची सलामी दिली. लखनौकडून मोहसीन खान आणि आवेश खान यांनी 1-1 विकेट घेतली.

आयपीएलच्या इतिहासातील हा पहिलाच सामना आहे, ज्यामध्ये दोन्ही संघांचे कर्णधार सख्खे भाऊ आहेत. गुजरातची कमान हार्दिक पांड्याच्या हाती आहे. तर कृणाल पांड्या लखनौ संघाचे कर्णधार आहे. केएल राहुल दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर आहे. अशा परिस्थितीत कृणालकडे लखनौ संघाची कमान आहे.

सीमाभागातील जनतेला सोडून दोन मंत्री कोणत्या बिळात लपले? राऊतांची सत्ताधाऱ्यांवर टीका

गुजरात-लखनौच्या सामन्यात प्लेइंग-11

गुजरात टायटन्स : ऋद्धिमान साहा (यष्टीरक्षक), शुभमन गिल, हार्दिक पंड्या (कर्णधार), विजय शंकर, अभिनव मनोहर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, मोहम्मद शमी, नूर अहमद आणि मोहित शर्मा.

लखनौ सुपर जायंट्स: क्विंटन डिकॉक (विकेटकीपर), काइल मेयर्स, दीपक हुडा, करण शर्मा, मार्कस स्टॉइनिस, क्रुणाल पांड्या (क), स्वप्नील सिंग, मोहसीन खान, आवेश खान, यश ठाकूर आणि रवी बिश्नोई.

Tags

follow us