Download App

हरभजन सिंगचा ‘तो’ व्हिडिओ, प्रचंड विरोध अन् जाहीर माफी, जाणून घ्या नेमकं प्रकरण

Harbhajan Singh: भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग (Harbhajan Singh) काहींना काही कारणामुळे सोशल मीडियावर (Social Media) नेहमी चर्चेत असतो

  • Written By: Last Updated:

Harbhajan Singh: भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग (Harbhajan Singh) काहींना काही कारणामुळे सोशल मीडियावर (Social Media) नेहमी चर्चेत असतो. काही दिवसापूर्वी हरभजन सिंग आणि पाकिस्तानचा माजी खेळाडू कामरान अकमल (Kamran Akmal) यांच्यात वाद झाला होता त्यामुळे हरभजन सिंग सोशल मीडियावर चर्चेत होता मात्र पुन्हा एकदा तो एका नवीन कारणामुळे चर्चेत आला आहे.

इतकंच नाहीतर त्याने या प्रकरणात माफी देखील मागितली आहे. आता तुम्ही विचार करत असाल की अशी कोणती चुक होती ज्यामुळे हरभजन सिंगला माफी मागावी लागत आहे. मग जाणून घेऊया नेमकं प्रकरण काय आहे.

काही दिवसापूर्वी भारतीय संघाने लिजेंड्स चॅम्पियनशिपच्या (Legends Championship 2024) फायनलमध्ये पाकिस्तानचा (Pakistan) 5 गडी राखून पराभव केला होता. त्यानंतर हरभजन सिंग, सुरेश रैना आणि युवराज सिंगसह काही माजी क्रिकेटपटूंनी सोशल मीडियावर एक रील शेअर केला होता.

या रीलमध्ये माजी क्रिकेटपटू ‘तौबा तौबा’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल देखील झाला आहे. मात्र आता या प्रकरणात हरभजन सिंगने माफी मागितली आहे.

नेमकं प्रकरण काय

लिजेंड्स चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पाकिस्तानचा 5 गडी राखून पराभव करत भारतीय संघाने ही स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर तौबा… तौबा या गाण्यावर डान्स करत भारतीय खेळाडू अपंगांसारखे चालत होते. मात्र या व्हिडिओवर भारताची पॅरा बॅडमिंटन खेळाडू मानसी जोशीने टीका केली होती. भारतीय क्रिकेटपटूंनी अपंगत्वाची खिल्ली उडवली होती अशी टीका मानसी जोशीने केली होती. या व्हिडिओवर वाद वाढल्यानंतर तो व्हिडिओ डिलीट करण्यात आला आहे आणि आता हरभजन सिंगने या प्रकरणात जाहीर माफी मागितली आहे.

हरभजन सिंगने सोशल मीडियावर म्हटले आहे की, आम्ही चॅम्पियनशिप जिंकलो आणि त्यानंतर तौबा… तौबा या गाण्यावर आम्ही रील शेअर केली होती. मात्र या रीलच्या माध्यमातून आम्हाला कोणाच्याही भावना दुखवायच्या नव्हत्या. आम्हाला या रीलमधून फक्त सलग 15 दिवस सलग क्रिकेट खेळल्यावर नेमकं होतं तरी काय हे दाखवायचे होते.

Laxman Hake : … म्हणून शरद पवार भुजबळांची भेट, लक्ष्मण हाकेंचा मोठा खुलासा

हे रील करताना आमच्या मनात कोणाचा अपमान करण्याची इच्छा नव्हती. मात्र तरीही देखील आमच्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्य असतील, तर मी त्यांची माफी मागतो. असं हरभजन सिंग म्हणाला.

follow us