Download App

याला म्हणतात ग्रोथ! 8 वर्षात हार्दिक पांड्यांचे पॅकेज 10 लाखांवरुन 15 कोटींवर

मुंबई : IPL 2024 साठी हार्दिक पांड्या (Hardik Pandya) मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) ताफ्यात परतला आहे. यामुळे आता दोन वर्षे गुजरात टायटन्सचे (Gujrat Titans) कर्णधारपद भुषविल्यानंतर हार्दिक पुन्हा एकदा पाचवेळच्या चॅम्पियन असलेल्या मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसणार आहे. रविवारी रिटेन्शन डे च्या अखेरच्या दिवशी नाट्यमय घडामोडीनंतर अखेरच्या दोन तासांमध्ये हार्दिक मुंबईच्या ताफ्यात दाखल झाला. (Hardik Pandya has been bid from 10 lakhs to 15 crores in IPL in 8 years.)

मिळालेल्या माहितीनुसार, हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सने 15 कोटी रुपये मोजले. याशिवाय वेगळ्या ट्रान्सफर फीवरही सहमती झाली असून त्यातील 50 टक्के रक्कम हार्दिकला दिली जाणार आहे आणि उर्वरित 50 टक्के रक्कम गुजरात टायटन्सला दिली जाणार आहे. मात्र, या रक्कम जाहीर करण्यात आलेली नाही. हा पूर्णपणे रोख करार आहे. आयपीएल इतिहासात आजपर्यंतचा हा सर्वात महागडा ट्रेड मानला जात आहे.

IPL 2024 : मुंबईत ‘हार्दिक’ स्वागत! अखरेच्या दोन तासांत गुजरातने ‘सेनापती’ सोडला

8 वर्षात हार्दिक पांड्याला 10 लाख रुपयांवरुन 15 कोटी रुपयांची बोली :

हार्दिक पांड्याने 2015 च्या मोसमात मुंबई इंडियन्सकडून आयपीएलमध्ये एन्ट्री केली. त्यावेळी त्याची बेस प्राईज अवघी 10 लाख रुपये होती. याच किंमतीत त्याला मुंबईने संघात दाखल करुन घेतले. मुंबईत असताना हार्दिकने संघाला चारवेळा विजेतेपद पटकावून देण्यासाठी अनेकदा चमकदार कामिगीर केली होती.  इथल्या कामगिरीनेच हार्दिकसाठी टीम इंडियाचे दरवाजेही उघडले. आज हार्दिक पांड्या भारतीय संघाचा एक महत्वाचा भाग आणि टी-20 संघाचा कॅप्टनही आहे.

2022 च्या हंगामात, गुजरात टायटन्सने आयपीएलमध्ये प्रवेश केला आणि हार्दिक त्यांचा कर्णधार बनला. हार्दिकने पहिल्या सत्रातच टीमला विजेतेपद मिळवून दिले. तर 2023 च्या मोसमात, त्याने संघाला अंतिम फेरीत नेले, पण चेन्नई सुपर किंग्जकडून पराभव झाला त्यामुळे गुजरातचे सलग दुसरे विजेतेपद हुकले होते. आता पुन्हा एकदा हार्दिक पांड्या मुंबईच्या ताफ्यात दाखल झाला आहे. यावेळी त्याला मुंबईने तब्बल 15 कोटी रुपये मोजून ताफ्यात परत बोलवून घेतला आहे.

शुभमन गिल गुजरातचा नवा ‘सेनापती’ : हार्दिक पांड्यानंतर मिळाली नवी जबाबदारी

मुंबई इंडियन्स 11 खेळाडूंना रिलीज केले :

मुंबई इंडियन्सने (MI) 11 खेळाडूंनाही रिलीज केले आहे. त्यात अर्शद खान, रमणदीप सिंग, हृतिक शौकीन, राघव गोयल, जोफ्रा आर्चर, ट्रिस्टन स्टब्स, डुआन जॅन्सन, झ्ये रिचर्डसन, रिले मेरेडिथ, ख्रिस जॉर्डन आणि संदीप वॉरियर यांचा समावेश आहे.

मुंबई इंडियन्स ताफ्यात कोण? 

रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, देवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, इशान किशन, टिळक वर्मा, रमणदीप सिंग, टिम डेव्हिड, ट्रिस्टन स्टब्स, विष्णू विनोद, अर्जुन तेंडुलकर, मोहम्मद अर्शद खान, शम्स मुल्लानी, नेहल वढेरा, दुआन जॉन्सन, रोमारियो शेफर्ड, आकाश मधवाल,पियूष चावला, जेसन बेअर्नडॉर्फ, कुमार कार्तिकेय.

Tags

follow us