IPL 2024 : मुंबईत ‘हार्दिक’ स्वागत! अखरेच्या दोन तासांत गुजरातने ‘सेनापती’ सोडला

IPL 2024 : मुंबईत ‘हार्दिक’ स्वागत! अखरेच्या दोन तासांत गुजरातने ‘सेनापती’ सोडला

मुंबई : तब्बल दोन तासांच्या नाट्यमय घडामोडींनंतर IPL 2024 साठी हार्दिक पांड्या (Hardik Pandya) मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) ताफ्यात परतला आहे. यामुळे आता दोन वर्षे गुजरात टायटन्सचे (Gujrat Titans) कर्णधारपद भुषविल्यानंतर हार्दिक पुन्हा एकदा पाचवेळच्या चॅम्पियन असलेल्या मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसणार आहे. रविवारी रिटेन्शन डे च्या अखेरच्या दिवशी नाट्यमय घडामोडीनंतर अखेरच्या दोन तासांमध्ये हार्दिक मुंबईच्या ताफ्यात दाखल झाला. आयपीएल इतिहासात आजपर्यंतचा हा सर्वात महागडा ट्रेड मानला जात आहे. हार्दिकच्या मुंबईतील पुनरागमनासह मागील काही दिवसांपासून हार्दिक मुंबईत परतणार असल्याच्या चर्चांनाही पूर्णविराम मिळाला. (Hardik Pandya returns to Mumbai Indians squad for IPL 2024)

दोन तासांमध्ये घडामोडी कशा घडल्या?

स्टार स्पोर्ट्समधील रिटेनशन शो दरम्यान, गुजरातने हार्दिकला रिटेन केल्याची घोषणा केली. मात्र, त्यानंतरही हार्दिकच्या मुंबईत पतरण्याच्या आशा जिवंत होत्या. कारण औपचारिक कागदपत्रे तयार झाली नव्हती आणि रिटेन ठेवण्याची मुदत संपल्यानंतरही ट्रेडिंग विंडो ओपन राहणार होती. संध्याकाळी 5.25 च्या सुमारास, हार्दिकला रिटेन कायम ठेवण्याची घोषणा केली आणि त्यानंतर 7.25 च्या सुमारास क्रिकेट वेबसाइट क्रिकबझने हार्दिक मुंबईत परतला असल्याचे वृत्त दिले.

मिळालेल्या माहितीनुसार, हा पूर्णपणे रोख करार आहे. मुंबई इंडियन्सने आधी 17.5 कोटी रुपये दिलेल्या कॅमेरॉन ग्रीनला आरसीबीसोबत ट्रेड केले. त्यानंतर त्याच पैशांच्या बदल्यात हार्दिकसाठी 15 कोटी रुपये मोजले. याशिवाय वेगळ्या ट्रान्सफर फीवरही सहमती झाली असून त्यातील 50 टक्के रक्कम हार्दिकला दिली जाणार आहे आणि उर्वरित 50 टक्के रक्कम गुजरात टायटन्सला दिली जाणार आहे. मात्र, या रक्कम जाहीर करण्यात आलेली नाही.

IND vs PAK : वर्ल्डकपनंतर पुन्हा भारत-पाक भिडणार; ‘या’ दिवशी होणार हायहोल्टेज सामना

हार्दिकने 2015 मध्ये मुंबई इंडियन्समधून आयपीएल करिअरची सुरुवात केली होती. इथल्या कामगिरीनेच हार्दिकसाठी टीम इंडियाचे दरवाजेही उघडले. मुंबईत असताना हार्दिकने संघाला चारवेळा विजेतेपद पटकावून देण्यासाठी अनेकदा चमकदार कामिगीर केली होती. त्यानंतर 2022 च्या हंगामात, गुजरात टायटन्सने आयपीएलमध्ये प्रवेश केला आणि हार्दिक त्यांचा कर्णधार बनला. हार्दिकने पहिल्या सत्रातच टीमला विजेतेपद मिळवून दिले. तर 2023 च्या मोसमात, त्याने संघाला अंतिम फेरीत नेले, पण चेन्नई सुपर किंग्जकडून पराभव झाला त्यामुळे गुजरातचे सलग दुसरे विजेतेपद हुकले होते.

मुंबई इंडियन्स 11 खेळाडूंना रिलीज केले :

मुंबई इंडियन्सने (MI) 11 खेळाडूंनाही रिलीज केले आहे. त्यात अर्शद खान, रमणदीप सिंग, हृतिक शौकीन, राघव गोयल, जोफ्रा आर्चर, ट्रिस्टन स्टब्स, डुआन जॅन्सन, झ्ये रिचर्डसन, रिले मेरेडिथ, ख्रिस जॉर्डन आणि संदीप वॉरियर यांचा समावेश आहे.

स्पॉट फिक्सिंगनंतर एस श्रीशांत पुन्हा अडचणीत; केरळ पोलिसांकडून गुन्हा दाखल

मुंबई इंडियन्स ताफ्यात कोण? 

रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, देवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, इशान किशन, टिळक वर्मा, रमणदीप सिंग, टिम डेव्हिड, ट्रिस्टन स्टब्स, विष्णू विनोद, अर्जुन तेंडुलकर, मोहम्मद अर्शद खान, शम्स मुल्लानी, नेहल वढेरा, दुआन जॉन्सन, रोमारियो शेफर्ड, आकाश मधवाल,पियूष चावला, जेसन बेअर्नडॉर्फ, कुमार कार्तिकेय.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube