Hardik Pandya On Yash Dayal : गुजरात टायटन्सचा वेगवान गोलंदाज यश दयालने 9 एप्रिल रोजी कोलकाता विरुद्ध गुजरात सामन्यात 5 चेंडूत सलग 5 षटकार ठोकले होते. केकेआरला विजयासाठी शेवटच्या 5 चेंडूत 28 धावांची गरज होती आणि तेव्हा रिंकू सिंगने यश दयालला सलग 5 षटकार ठोकले होते. या सामन्यापासून यश दयाल गुजरातच्या प्लेइंग-11 मधून बाहेर आहे. कर्णधार हार्दिक पांड्याला याचे कारण विचारले असता त्याने आश्चर्यकारक खुलासा केला आहे.
स्टार स्पोर्ट्सशी संवाद साधताना हार्दिक म्हणाला, यशच्या पुनरागमनाबद्दल काहीही सांगू शकत नाही. तो सध्या आजारी आहे. त्याचे वजन सात ते आठ किलोने कमी झाले आहे. तो व्हायरल तापाच्या विळख्यात होता. त्याची अवस्था अशी नाही की तो मैदानात उतरू शकेल. मला वाटतं त्याला मैदानात उतरायला अजून बराच अवधी आहे.
Sujay Vikhe : आमची कोंडी करणारा अजून जन्माला यायचाय; सुजय विखेंचा लंके-औटींना टोला
हार्दिकच्या वक्तव्यापूर्वी यशला गुजरातच्या प्लेइंग-11 मधून दबावाची परिस्थिती हाताळता न आल्याने त्याला बाहेर ठेवण्यात आल्याचे मानले जात होते. या मोसमात त्याची कामगिरीही चांगली झाली नाही. आयपीएल 2023 च्या तीनही सामन्यांमध्ये तो खेळला पण त्याला एकही विकेट मिळवता आली नाही. मग KKR विरुद्धच्या सामन्याच्या शेवटच्या षटकात त्याला ज्या प्रकारे झटका दिला गेला तो कदाचित त्याच्या कारकिर्दीतील सर्वात वाईट क्षण असेल.
Sujay Vikhe : आमची कोंडी करणारा अजून जन्माला यायचाय; सुजय विखेंचा लंके-औटींना टोला
हा 25 वर्षीय तरुण गोलंदाज गेल्या मोसमात गुजरात टायटन्ससाठी महत्त्वाचा गोलंदाज ठरला. यशने IPL 2022 मध्ये 9 सामन्यात 11 विकेट घेतल्या. गेल्या हंगामातही त्याचा इकॉनॉमी रेट जास्त होता. त्याने एका षटकात 9 पेक्षा जास्त धावा दिल्या होत्या.