Hockey World Cup : हॉकी विश्वचषकातील पहिल्या सामन्यात चीनविरुद्ध 2-2 अशी बरोबरीने सामना सुटल्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिकेचा 6-1 असा दणदणीत पराभव केला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने शानदार सुरुवात केली होती. मात्र भारताने हळूहळू आपला सूर गवसला आणि पहिल्या सत्राच्या (क्वार्टर) अखेरच्या क्षणांपासून खेळावर नियंत्रण मिळवण्यास सुरुवात केली आणि मध्यंतरापर्यंत 3-0 अशी भक्कम आघाडी घेतली. सुनीलिता टोप्पो हिने 10 व्या मिनिटाला गोल करून भारताला सुरुवातीची आघाडी मिळवून दिली.
तर नवनीत कौरने 16 व्या मिनिटाला पेनल्टीचे गोलमध्ये रूपांतर करून आघाडी वाढवली. 24 व्या मिनिटाला सुशीला चानूने उत्कृष्ट गोल करत भारताला 3-0 अशी आघाडी मिळवून दिली. मध्यंतरापर्यंत भारत 3-0 अशा आघाडीवर होता. तिसऱ्या सत्रात भारताने 8 व्या मिनिटाला आणखी एक गोल करून आपली आघाडी 4-0 अशी वाढवली. दीपिकाने भारतासाठी हा चौथा गोल केला. दक्षिण आफ्रिकेला तिसऱ्या सत्रात पेनल्टी कॉर्नर मिळाला, परंतु त्यांना त्याचे गोलमध्ये रूपांतर करता आले नाही.
News Alert! Indian women’s hockey team defeats South Africa 6-1 in World Cup pool match in Amstelveen, the Netherlands pic.twitter.com/jpHO1R5aa6
— Press Trust of India (@PTI_News) August 18, 2026
… तर 40 आमदार अपात्र ठरणार; विधानसभा अध्यक्षांना टार्गेट करत कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद
तिसऱ्या सत्राच्या अखेरच्या क्षणांत लालरेम्सियामीने आणखी एक गोल करत भारताची आघाडी 5-0 अशी केली. सामन्याच्या शेवटच्या मिनिटात साक्षी राणाने पुन्हा गोल केला आणि तिसऱ्या सत्राच्या (क्वार्टरच्या) अखेरीस धावसंख्या 6-0 अशी झाली. चौथ्या सत्रात दक्षिण आफ्रिकेने पेनल्टी कॉर्नरद्वारे या विश्वचषक स्पर्धेतील आपला पहिला गोल नोंदवला.
