Download App

आयपीएल डॉट बॉल, बीसीसीआय आता किती झाडं लावणार?

TATA IPL dot ball : आयपीएल (IPL) 2023 च्या अंतिम सामन्यात चेन्नईने गुजरात टायटन्सचा पराभव करत आयपीएलचे विजेतेपद पटकावले. प्लेऑफच्या पहिल्या सामन्यापासू ते अंतिम सामन्यापर्यंत डॉट बॉलच्या ग्राफिक्समध्ये बदल पाहायला मिळाला होता. या मॅचमध्ये फेकल्या जात असलेल्या डॉट बॉलच्या ऐवजी झाडाचे इमोजी (TATA IPL Green Dots) दिसत होती. झाडाच्या इमोजीमागे बीसीसीआयचा पर्यावरणीय उपक्रम होता. प्रत्येक डॉट बॉलसाठी 500 झाडे लावण्याचा निर्णय मंडळाने घेतला होता. यानुसार उपक्रमानुसार बीसीसीआयला टाटा समूहासोबत किती रोपे लावणार आहे ते पाहूया.

दरम्यान, क्वालिफायर 1 मध्ये चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर CSK ने गुजरातला हरवून अंतिम स्थान निश्चित केले होते. त्या सामन्यात एकूण 84 डॉट बॉल टाकण्यात आले. त्यामुळे 42 हजार रोपांची लागवड करावी लागणार आहे. चेन्नईच्याच मैदानावर एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्सने लखनऊ सुपर जायंट्सचा पराभव केला होता. त्यावेळी एकूण 96 डॉट बॉल टाकण्यात आले होते म्हणजे 48,000 झाडे लावण्यात येणार आहेत. त्या सामन्यात, MI च्या आकाश मधवालने 3.2 षटकात 5 धावांत 5 विकेट घेत 17 डॉट्स बॉल टाकले होते.

Wrestlers Protests :कुस्तीपटूंसाठी शेतकरी नेता मैदानात, सरकारला दिला अल्टिमेटम

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममधील क्वालिफायर 2 मध्ये गुजरातने मुंबईला पराभूत करून अंतिम स्थान पक्के केले होते. त्या सामन्यात एकूण 67 डॉट बॉल टाकण्यात आले, म्हणजे 26,5000 झाडे लावण्यात येणार आहेत. अहमदाबादमधील अंतिम सामन्यात CSK ने GT ला हरवून पाचवे विजेतेपद पटकावले होते. या सामन्यात एकूण 45 डॉट बॉल टाकण्यात आले, म्हणजे 22,500 झाडे लावण्यात येणार आहेत.

IPL मध्ये पराभव गुजरातचा पण महाविकास आघाडीच्या नेत्यांचा आनंद गगनात मावेना!

त्यामुळे, IPL 2023 च्या प्लेऑफमध्ये एकूण 294 डॉट बॉल टाकण्यात आले होते. क्वालिफायर 1, एलिमिनेटर, क्वालिफायर 2 आणि फायनल या सामन्यातील एकूण 1,47,000 झाडे बीसीसीआय आणि टाटा समूह लावणार आहेत. मधवाल, मोहम्मद शमी, रशीद खान, मथिशा पाथिराना यांसारख्या खेळाडूंनी प्लेऑफच्या सामन्यात त्यांच्या डॉट बॉलद्वारे या उपक्रमाला हातभार लावला, ज्यामध्ये संपूर्ण भारतात एक लाखाहून अधिक झाडे लावण्यात येणार आहेत.

Tags

follow us