Women T20 World Cup: सेमीफायनलमध्ये टीम इंडिया ऑस्ट्रेलियावर कशी मात करणार? टीम इंडियाचे रेकॉर्ड खूप वाईट

WT20 1st SF : महिला टी-20 विश्वचषक दक्षिण आफ्रिकेत खेळला जात आहे. गटातील सामन्यांनंतर उपांत्य फेरीतील ४ संघ निश्चित झाले आहेत. भारताव्यतिरिक्त ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि यजमान दक्षिण आफ्रिकेच्या संघाने महिला टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित केले आहे. पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाचे आव्हान असेल. दोन्ही संघांमधील हा सामना […]

Untitled Design

टीम इंडियाला

WT20 1st SF : महिला टी-20 विश्वचषक दक्षिण आफ्रिकेत खेळला जात आहे. गटातील सामन्यांनंतर उपांत्य फेरीतील ४ संघ निश्चित झाले आहेत. भारताव्यतिरिक्त ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि यजमान दक्षिण आफ्रिकेच्या संघाने महिला टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित केले आहे. पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाचे आव्हान असेल. दोन्ही संघांमधील हा सामना 23 फेब्रुवारीला होणार आहे, तर दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ इंग्लंडसमोर असेल. इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा उपांत्य सामना २४ फेब्रुवारी रोजी होणार आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियाचे रेकॉर्ड खूपच खराब

मात्र, हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाच्या आव्हानाला सामोरे जावं लागणार आहे. भारतीय संघाला कांगारूंवर मात करणे सोपे जाणार नसल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ आतापर्यंत 30 वेळा T20 सामन्यात आमनेसामने आले आहेत, मात्र टीम इंडियाने फक्त 7 सामने जिंकले आहेत. तर ऑस्ट्रेलियन संघाने 22 सामन्यांत भारताचा पराभव केला आहे. याशिवाय दोन्ही संघांमधील एकही सामना निकालाविना संपला आहे.

Devendra Fadanvis : राष्ट्रपती राजवट का? कुणाच्या सांगण्यावरून लागली? हेही सांगा; फडणवीसांचे पवारांना थेट चॅलेंज 

टीम इंडिया हा खराब रेकॉर्ड सुधारू शकेल का?

ऑस्ट्रेलियाविरुद्धचा उपांत्य सामना हरमनप्रीत कौरच्या संघासाठी सोपा होणार नाही, पण टीम इंडिया हे खराब रेकॉर्ड सुधारू शकेल का? या स्पर्धेत भारतीय संघाने आतापर्यंत 4 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये टीम इंडियाने 3 सामने जिंकले आहेत, तर त्यांना इंग्लंडविरुद्ध 11 धावांनी पराभव स्वीकारावा लागला आहे. या स्पर्धेत भारतीय फलंदाजांबद्दल बोलायचे झाले तर स्मृती मानधना व्यतिरिक्त फक्त ऋचा घोषच्या बॅटमधून धावा झाल्या आहेत. कर्णधार हरमनप्रीत कौरसह मधल्या फळीतील फलंदाजांनी निराश केले आहे.आत्ता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाला कमकुवतपणा दूर कराव्या लागणार आहेत.

Exit mobile version