SRH vs LSG : हैदराबादने लखनौविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा घेतला निर्णय

IPL 2023 च्या 58 व्या सामन्यात आज सनरायझर्स हैदराबादचा सामना लखनौ सुपरजायंट्सशी होणार आहे. हा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आहे. लखनौ आणि हैदराबाद हे दोन्ही संघ प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी झगडत आहेत. लखनौचा संघ 11 पैकी पाच सामने जिंकून 11 गुणांसह गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. त्यांनी आतापर्यंत पाच सामने गमावले असून एक सामना पावसाने वाहून […]

1622061272_cricket

1622061272_cricket

IPL 2023 च्या 58 व्या सामन्यात आज सनरायझर्स हैदराबादचा सामना लखनौ सुपरजायंट्सशी होणार आहे. हा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आहे. लखनौ आणि हैदराबाद हे दोन्ही संघ प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी झगडत आहेत. लखनौचा संघ 11 पैकी पाच सामने जिंकून 11 गुणांसह गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. त्यांनी आतापर्यंत पाच सामने गमावले असून एक सामना पावसाने वाहून गेला आहे. त्याचवेळी हैदराबाद 10 सामन्यांत चार विजय आणि सहा पराभवांसह आठ गुणांसह नवव्या स्थानावर आहे.

सनरायझर्स हैदराबादची प्लेइंग इलेव्हन

सनरायझर्स हैदराबाद प्लेइंग इलेव्हन: अभिषेक शर्मा, अनमोलप्रीत सिंग, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम (क), हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, अब्दुल समद, टी नटराजन, मयंक मार्कंडे, भुवनेश्वर कुमार, फजलहक फारुकी

लखनौ सुपर जायंट्सची प्लेइंग इलेव्हन
लखनौ सुपर जायंट्स प्लेइंग इलेव्हन: क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), काइल मेयर्स, कृणाल पांड्या (क), प्रेरक मांकड, मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन, अमित मिश्रा, यश ठाकूर, रवी बिश्नोई, युधवीर सिंग चरक, आवेश खान

Exit mobile version