Download App

T20 World Cup 2024 : वेळापत्रक जाहीर; 9 जूनला भारत-पाकिस्तान ‘या’ ठिकाणी भिडणार !

  • Written By: Last Updated:

T20 World Cup schedule: टी 20 वर्ल्डकपचे वेळापत्रक (T20 World Cup schedule) आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेने (
ICC) जाहीर केले आहे. यंदाचा वर्ल्डकपचे आयोजन अमेरिका आणि वेस्ट इंडिजने संयुक्तपणे केले असून, 1 ते 29 जून दरम्यान सामने खेळविण्यात येणार आहे. भारत (India) आणि पाकिस्तान (Pakistan) संघ एकाच ग्रुपमध्ये आहेत. हे दोन्ही संघ 9 जूनला न्यूयॉर्कमध्ये भिडणार आहे. भारतीय संघ पहिले तीन सामने न्यूयॉर्क आणि चौथा सामना फ्लोरिडा येथे खेळणार आहे. तर 26 आणि 27 जूनला सेमीफायनल होणार आहेत. फायनल 29 जूनला बारबाडोस येथे होणार आहे. या वर्ल्डकपमध्ये तब्बल 55 सामने होणार आहे. त्यात वेस्ट इंडिजमधील सहा मैदानावर आणि अमेरिकेतील तीन मैदानावर सामने होणार आहेत.



‘आम्ही किती मोठे कलाकार आहोत हे तुम्ही पंधरा महिन्यांपूर्वी…’; उदय सामतांचा मिश्कील टोला

29 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत तब्बल वीस संघ सहभागी होणार आहेत. यातील दहा संघांचे सामने संयुक्त राज्य अमेरिकेत खेळविले जाणार आहेत. तर उर्वरित सामने लॉडरहिल, डलास आणि न्यूयॉर्कमध्ये खेळविली जातील. तर भारत आणि पाकिस्तान हे संघ 9 जून रोजी लॉन्ग आयलँड येथील नासाऊ काउंटी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर होईल. कॅरेबियन आयलँडच्या वेगवेगळ्या सहा बेटांवर 41 सामने खेळविले जाणार आहे. तर सेमीफायनलचे सामने त्रिनिदाद आणि टोबॅगो आणि गुयाना येथे खेळविली जाणार आहे.

कॅनाडा आणि आर्यलँड पहिल्याचा टी-20 खेळणार

या स्पर्धेत संघाचे चार ग्रुप आहेत. ग्रुप एमध्ये सह यजमान अमेरिकेचा संघ आहे. याच गटात कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान संघ आहे. तर पहिल्यांदा टी-20 वर्ल्डकप खेळत असलेल्या कॅनडा आणि आर्यलँड संघही ‘ग्रुप ए’मध्ये आहेत.

भारतीय संघाचे सामने-आर्यलँडविरुद्ध 5 जून, पाकिस्तानविरुद्ध 9 जून, अमेरिकेविरुद्ध 12 जून, कॅनडाविरुद्ध 15 जून


वीस देशांचे संघ सहभागी आहेत. कसे ग्रुप आहे ते बघा ?

ग्रुप ए-भारत, पाकिस्तान, आयरलॅंड, कनाडा, अमेरिका
ग्रुप बी: इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नामीबिया, स्कॉटलँड, ओमान
ग्रुप सी: न्यूजीलँड, वेस्ट इंडीज, अफगानिस्तान, युगांडा, पापुआ न्यू गिनी
ग्रुप डी: दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, नेदरलँड, नेपाळ.

follow us