Under-19 World Cup : पुरुषांच्या अंडर-19 विश्वचषकाचे (Under-19 World Cup) वेळापत्रक जाहीर झाले आहे. ही स्पर्धा 19 जानेवारीपासून सुरू होत आहे. अंतिम सामना 11 फेब्रुवारीला होणार आहे. या कालावधीत एकूण 41 सामने खेळवले जाणार आहेत. भारतीय संघ 20 जानेवारीपासून आपल्या वर्ड कप मोहिमेला सुरुवात करणार आहे.
ICC ने सोमवारी संध्याकाळी अंडर-19 विश्वचषकाचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले. यावेळी विश्वचषकात चार गट करण्यात आले आहेत. चारही गटात प्रत्येकी चार संघ ठेवण्यात आले आहेत. प्रत्येक संघ त्यांच्या गटातील उर्वरित तीन संघांविरुद्ध प्रत्येकी एक सामना खेळेल. चारही गटांतील अव्वल 3 संघ पुढील फेरीत प्रवेश करतील.
म्हणजेच दुसऱ्या फेरीत एकूण 12 संघ असतील. येथे प्रत्येक संघ दुसऱ्या गटातील दोन संघांसह प्रत्येकी एक सामना खेळेल. म्हणजेच या फेरीत प्रत्येक संघाचे दोन सामने होतील. यानंतर टॉप-4 संघ उपांत्य फेरीत पोहोचतील. सेमीफायनल आणि फायनलसाठीही राखीव दिवस ठेवण्यात आला आहे.
‘…तोच न्याय प्रफुल्ल पटेलांना लावणार का?’, मलिकांच्या मुद्यावरून ठाकरेंनी फडणवीसांना घेरलं
अ गट : भारत, बांग्लादेश, आयर्लंड, अमेरिका
ब गट: इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, स्कॉटलंड
क गट: ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, झिम्बाब्वे, नामिबिया
ड गट : अफगाणिस्तान, पाकिस्तान, न्यूझीलंड, नेपाळ
ग्रुप स्टेजमध्ये भारतीय संघ पहिला सामना बांग्लादेशसोबत 20 जानेवारीला, दुसरा सामना 25 जानेवारीला आयर्लंडशी आणि तिसरा सामना 28 जानेवारीला अमेरिकेसोबत खेळणार आहे. ही स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत होणार आहे. हे सर्व सामने येथील पाच मैदानांवर खेळवले जातील.
Article 370 : …तर मग नेहरुंनी ‘तात्पुरतं’ असा शब्द का वापरला? अमित शाहांनी विरोधकांना फटकारलं
1988 पासून अंडर-19 वर्ल्ड कपचे आयोजन केले जात आहे. हे 1998 पासून दर दुसऱ्या वर्षी आयोजित केले जाते. आतापर्यंत टीम इंडिया या स्पर्धेत पाच वेळा चॅम्पियन बनली आहे. ऑस्ट्रेलियाला तीनदा तर पाकिस्तानला दोनदा हे विजेतेपद मिळाले आहे. बांगलादेश, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांनीही प्रत्येकी एकदा ही ट्रॉफी जिंकली आहे.