Download App

हॉटेल रुमचे भाडे वाचून डोळे होतील पांढरे; वर्ल्डकपआधीच भारत-पाक सामन्याचा उत्साह शिगेला

ICC ODI World Cup 2023 :  क्रिकेट हा असा खेळा आहे की भारतात या खेळाला धर्मच मानले जाते. देशातील सर्व जनता या खेळासाठी वेडी आहे. यावर्षी क्रिकेटचा एकदिवसीय विश्वचषक भारतात होणार आहे. जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियममध्ये या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. विशेष बाब म्हणजे उद्घाटन आणि अंतिम सामन्याशिवाय भारत-पाकिस्तानचा हाय व्होल्टेज सामनाही या मैदानावर खेळवला जाणार आहे. जो आजपासून 110 दिवसांनी खेळला जाईल.

या सामन्याची देशातील आणि जगभरातील लोकांची क्रेझ इतकी आहे की अहमदाबादमधील हॉटेलच्या जवळपास 80 टक्के खोल्या बुक झाल्या आहेत. या खोल्यांच्या भाड्याबद्दल बोलायचे झाले तर विश्वचषक सुरू होण्याच्या 100 दिवस आधी हा आकडा 50 हजार ते एक लाख रुपयांपर्यंत पोहोचला आहे. अशा स्थितीत येत्या काळात हॉटेलच्या खोल्यांसाठीचा लढा आणखी वाढणार आहे.

‘वानखेडे’चं महत्त्व संपलं?; IPLनंतर वर्ल्डकपचा अंतिम सामनाही गुजरातमध्ये!

आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुरू होण्यास अद्याप जवळपास 100 दिवस शिल्लक आहेत, परंतु अहमदाबादमधील हॉटेल्सने पहिला चेंडू टाकण्यापूर्वीच धावा काढण्यास सुरुवात केली आहे. उद्योगातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, साडेतीन महिने अगोदर बुकिंग करूनही, शहरातील पंचतारांकित हॉटेलमधील साधारण श्रेणीतील खोलीचे भाडे 50,000 रुपयांपर्यंत पोहोचले आहे. तर उर्वरित काळात अशा खोल्यांची किंमत 6,500-10,500 रुपये इतकी असते.

भाजपच्या पडद्यामागील चाणाक्याला काँग्रेसचा दणका; राहुल गांधींवरील व्हिडीओ अमित मालवीयांना महागात

जगातील सर्वात मोठे स्टेडियम असणाऱ्या नरेंद्र मोदी स्टेडियमची प्रेक्षक क्षमता 1,32,000 आहे आणि या सर्व जागा विश्वचषकाच्या सामन्यांमध्ये पूर्ण भरल्या जाण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे शहरात बाहेरून येणाऱ्यांची मोठी गर्दी असणार आहे. प्रत्येक सामन्यासाठी किमान 1 लाख लोक पर्यटन नगरीत पोहोचतील असा विश्वास आहे. त्यामुळेच विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर होताच येथील हॉटेल्स बुक करणाऱ्या वेबसाइट्सवर मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली आहे. त्यामुळेच भाडेवाढ सातत्याने होत आहे.

 

Tags

follow us