Download App

Babar Azam टीकाकारांवर भडकला! सेमीफायनलबद्दल बाबर प्रचंड आशावादी

Babar Azam : एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील (ICC ODI World Cup)आपले आव्हान कायम राखतानाच उपांत्य फेरी गाठण्यासाठी पाकिस्तानला (Pakistan)आज, शनिवारी इंग्लंडविरुद्ध कडवी झूंज द्यावी लागणार आहे. पाकिस्तानला आजचा सामना 287 धावांनी किंवा 284 बॉल राखून विजयश्री खेचून आणावाच लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मोईन खान आणि शोएब मलिक (Shoaib Malik)काही पाकिस्तानच्या माजी कर्णधारांनी बाबरच्या कर्णधारपदावर उघडपणे टीका केली आहे. कर्णधारपदाच्या दबावाचा बाबर आझमच्या फलंदाजीवर परिणाम झाल्याचं या माजी कर्णधारांनी म्हटलंय.

Mr And Mrs Mahi: जान्हवी अन् राजकुमारच्या ‘मिस्टर अ‍ॅन्ड मिसेस माही’ ची रिलीज डेट ढकलली पुढे

यंदाच्या वर्ल्ड कपमध्य पाकिस्तान किक्रेट संघाची कामगिरी आत्तापर्यंत चांगली नाही. पाकिस्तानी संघ स्पर्धेतून बाहेर होण्याच्या पडण्याच्या मार्गावर आहे. पाकिस्तानचा संघ आज शनिवारी (दि.11) कोलकाता येथील ईडन गार्डनवर इंग्लंडविरुद्ध खेळणार आहे. उपांत्य फेरी गाठण्यासाठी हा सामना मोठ्या फरकानं जिंकावा लागेल.

John Bailey Passes Away : फिल्म अकादमीचे माजी अध्यक्ष जॉन बेली यांचे निधन

सामन्याआधी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने टीकाकारांना फटकारलं आहे. तो म्हणाला की, टीव्हीवर बसून मत मांडणं सर्वांना सोपं वाटतं. मोईन खान आणि शोएब मलिकसह माजी कर्णधारांनी बाबरच्या कर्णधारपदावर उघडपणानं टीका केली.

कर्णधारपदाच्या दबावाचा बाबर आझमच्या फलंदाजीवर परिणाम झाल्याचं या माजी कर्णधारांचं मत आहे. टीकेवर बाबर म्हणाला, टीव्हीवर आपलं मतं देणं खूप सोपं आहे. जर कोणाला सल्ला द्यायचा असेल तर त्यांनी मला थेट फोन करावा, त्यांचं स्वागत आहे, माझा नंबर सर्वांना माहीत आहे, असंही यावेळी बाबर म्हणाला.

मलिक म्हणाला होता की, बाबर एक फलंदाज म्हणून हुशार आहे, पण कर्णधार म्हणून नाही. त्याचवेळी, कर्णधारपद सोडल्यानंतर आता फलंदाजीवर अधिक लक्ष केंद्रित करणाऱ्या भारतीय फलंदाज विराट कोहलीकडून बाबरने शिकावं, असाही सल्ला मलिकने दिला.

या टिकेला बाबरनं त्याच अंदाजात उत्तर दिलं आहे. तो म्हणाला की, माझ्या फॉर्मवर कधीही परिणाम झाला नाही. मी गेली तीन वर्षे माझ्या संघाचे नेतृत्व करत आहे. तो म्हणाला की मला असे कधीच वाटले नाही. मी विश्वचषकात जशी कामगिरी करायला हवी होती तशी कामगिरी केली नाही, म्हणूनच लोक म्हणत आहेत की मी दडपणाखाली आहे.

बाबर म्हणाला की, मला असं वाटत नाही की, मी कोणत्याही दबावाखाली आहे किंवा यामुळे मला काही वेगळे वाटले आहे. क्षेत्ररक्षण करताना मी माझे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करतो. फलंदाजी करताना, मी धावा कशा कराव्या आणि संघाला विजय मिळवून देण्यासाठी मी विचार करत असतो.

कर्णधारपदावरुन पायउतार होण्याच्या शक्यतेसह पाकिस्तानी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना बाबरपणे आपली बाजू मांडली. तो म्हणाला, तुम्ही कोणत्या निर्णयाबद्दल बोलत आहात हे मला माहीत नाही. खेळाडूंच्या निवडीबाबत आम्ही येथे जो निर्णय घेतो तो प्रशिक्षक आणि कर्णधाराचा निर्णय असतो. आम्ही परिस्थितीनुसार नियोजन करतो. कधी-कधी आम्ही त्यात यशस्वी होतो. आणि कधी अपयशाचा सामनाही करावा लागतो. अशा स्पष्ट शब्दांमध्ये बाबरने सुनावलं आहे.

Tags

follow us

वेब स्टोरीज