Download App

टीम इंडियाच्या कर्णधाराला आयसीसीचा झटका, दोन सामन्यांची बंदी

Harmanpreet Kaur Ban: भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरला आयसीसीने मोठा झटका दिला आहे. बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात बेशिस्तपणा आणि अंपायरिंगच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने आयसीसीने हरमनप्रीतवर दोन आंतरराष्ट्रीय सामन्यांची बंदी घालण्यात आली आहे.

बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात बाद झाल्यानंतर हरमनप्रीत कौरने रागाने तिची बॅट स्टंपवर आदळली होती. तसेच, सामना संपल्यानंतर अंपायरिंगच्या भूमिकेवरही तिने प्रश्न उपस्थित केले होते. सामना संपल्यानंतर ट्रॉफी घेताना तिने बांगलादेशच्या कर्णधारासोबतही बेशिस्तपणा केला होता. त्यानंतर तिच्यावर बरीच टीका होत होती. यावरुन आयसीसीने हरमनप्रीत कौरला मॅच फीचा दंड आणि 2 सामन्यांची बंदी घालण्यात आली आहे.

पुरस्कार वापसीवर केंद्र सरकार लावणार लगाम, ‘हमीपत्र लिहून घेणार’

आयसीसीने आज संध्याकाळी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरू ही माहिती दिली आहे. आयसीसीने सांगितले की, हरमनप्रीत कौर आयसीसीच्या आचारसंहितेच्या कलम 2.8 नुसार दोषी आढळली आहे. हरमनप्रीतने बाद झाल्यानंतर स्टंपवर आदळली होती. यामध्ये ती दोषी आढळली आणि तिला मॅच फीच्या 50 टक्के दंड आणि 3 डिमेरिट पॉइंट्स देखील देण्यात आले. याशिवाय लेव्हल 1 मध्ये अंपायरच्या स्तरावर प्रश्नचिन्ह आढळल्याने, मॅच फीच्या 25 टक्के दंड आणि 1 डिमेरिट पॉइंट देण्यात आला आहे.

Tags

follow us