T20 World Cup 2024 IND vs PAK : टी 20 विश्वचषकाचा विजेता कोण असेल याचं उत्तर अंतिम (T20 World Cup) सामन्यानंतर मिळेल. या अंतिम सामन्यात पुन्हा भारत आणि पाकिस्तान भिडणार का (IND vs PAK) या प्रश्नाचं उत्तरही लवकरच मिळणार आहे. पण टीम इंडियाकडून लाजिरवाणा (Team India) पराभव झाल्यानंतर पाकिस्तान संघावर जबरदस्त कारवाई होणार हे निश्चित झालं आहे. विश्वचषकात सलग दोन पराभव स्वीकारलेल्या पाकिस्तान संघावर आता सुपर 8 मध्ये पोहोचण्याचे मोठे आव्हान आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड कडक कारवाई करण्याच्या मूडमध्ये आहे. कर्णधार बाबर आझमसह तीन खेळाडूंना धक्का देण्याची तयारी पूर्ण करण्यात आली आहे.
विश्वचषकातील पहिल्याच सामन्यात नवख्या अमेरिकेने पाकिस्तानला पराभवाचा धक्का दिला. या सामन्यातील सुपर ओव्हरमध्ये अमेरिकेच्या फलंदाज आणि गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली आणि पाकिस्तानचा पराभव केला. यानंतर दुसरा सामना भारता बरोबर झाला. या सामन्यातही पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव झाला. या सामन्यात अख्खा संघ 112 धावांवर ऑल आऊट झाला. या दोन पराभवानंतर या स्पर्धेतील पाकिस्तानचे आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे. आता सगळी गणिते जर तर वर अवलंबून आहेत.
IND vs PAK : वर्ल्डकपनंतर पुन्हा भारत-पाक भिडणार; ‘या’ दिवशी होणार हायहोल्टेज सामना
या ठिकाणी पाकिस्तानला चांगली कामगिरी तर करावीच लागेल शिवाय दुसऱ्या संघांच्या कामगिरीवर लक्ष ठेवावे लागणार आहे. या निराशाजनक कामगिरीनंतर बोर्डाने कारवाईचा इशारा दिला आहे. भारता विरुद्धच्या पराभवानंतर बोर्डाचे अध्यक्ष मोहसीन नक्वी म्हणाले की आता लहान सहान ऑपरेशनने काहीच होणार नाही तर मोठ्या ऑपरेशनची गरज आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर असे संकेत मिळत आहे की बोर्डाने कठोर कारवाई करण्याची तयारी केली आहे.
पाकिस्तानी मीडिया रिपोर्ट्स नुसार पाकिस्तान क्रिकेट बोर्ड कर्णधार बाबर आझमसह तीन प्रमुख खेळाडूंवर कारवाई करण्याची योजना तयार करत आहे. बाबर आझमसह रिजवान आणि शादाब खान यांच्यावर कारवाई होऊ शकते. या तीन खेळाडूंचा संघावर आवश्यकतेपेक्षा जास्त प्रभाव असल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले आहे. आता हा प्रभाव कमी करण्याचा प्लॅन बोर्ड करत आहे. आता बोर्ड या खेळाडूंवर काय कारवाई करणार याचा खुलासा लवकरच होईल. या पराभवानंतर सुपर 8 फेरीत पोहोचण्यासाठी पाकिस्तानला पुढील सर्व सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागणार आहेत.
अमेरिकेने इतिहास रचला! सुपर ओव्हरमध्ये पाकिस्तानचा धुव्वा; मुंबईचा नेत्रावळकर चमकला