Download App

ऑस्ट्रेलियाच्या विजयाने इंग्लंडची चांदी, सुपर 8 मधील एन्ट्री पक्की; स्कॉटलंडचं स्वप्न भंगलं

टी 20 विश्वचषक स्पर्धेतील 35 व्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने स्कॉटलंडचा पराभव करत त्यांना या स्पर्धेतूनच बाद केलं.

Australia beat Scotland : टी 20 विश्वचषकात आज इंग्लंडला ऑस्ट्रेलियाने गुडन्यूज दिली. स्पर्धेतील 35 व्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने स्कॉटलंडचा पराभव करत त्यांना या स्पर्धेतूनच बाद केलं. स्कॉटलंडने दमदार फलंदाजी करत केलेल्या 180 धावांचा ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी यशस्वी पाठलाग केला. या पराभवानंतर स्कॉटलंडचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. तर दुसरीकडे इंग्लंडला सुपर 8 फेरीत प्रवेश मिळाला आहे. ऑस्ट्रेलियाचा आजच्या विजयाने सुपर 8 मधील इंग्लंडची एन्ट्री पक्की केली.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना स्कॉटलंडने 180 धावा केल्या होत्या. स्कॉटलंडच्या फलंदाजांनी कांगारूंची गोलंदाजी अक्षरशः फोडून काढली. या सामन्यात कर्णधार पॅट कमिन्स नव्हता. त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नाही. स्कॉटलंडकडून ब्रँडन मॅकुलमने सर्वाधिक 60 धावा केल्या. रिची बेरिंग्टनने 42 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून ग्लेन मॅक्सवेलने 2 तर नॅथन एलिस, अॅडम झाम्पा आणि एश्टर एगर यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.

नामिबियाचा पराभव करत इंग्लंडचं कमबॅक; सुपर 8 चं गणित ऑस्ट्रेलियाच्या हाती

या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनीही जशास तसे उत्तर दिले. सलामीवीर ट्रॅव्हिस हेडने 49 चेंडूत 68 धावा केल्या. मार्कस स्टोइनिसने 29 चेंडूत 59 धावा केल्या. पण पुढे दोघेही बाद झाले. यानंतर आलेल्या टीम डेव्हिडने 14 चेंडूत 28 धावा करून संघाला विजय मिळवून दिला. या पराभवानंतर स्कॉटलंडचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. तर ऑस्ट्रेलियाच्या या विजयाचा इंग्लंडला चांगलाच फायदा झाला आहे. इंग्लंडने सुपर 8 फेरीत प्रवेश मिळवला आहे.

इंग्लंडची सुपर 8 मध्ये एन्ट्री

ऑस्ट्रेलिया आणि स्कॉटलंड यांच्यातील सामन्यावर इंग्लंडचं भवितव्य होतं. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला असता तरच इंग्लंडला सुपर 8 मध्ये प्रवेश मिळाला असता. घडलंही तसंच. स्कॉटलंडने दिलेल्या मोठ्या आव्हानाचाही ऑस्ट्रेलियाने यशस्वी पाठलाग केला. मोठे लक्ष्य असतानाही स्कॉटलंडच्या गोलंदाजांना या लक्ष्याचा बचाव करता आला नाही. सुमार गोलंदाजीचा फटका संघाला बसला आणि सामना गमावला.

T20 विश्वचषकात टीम इंडिया ‘या’ दोन संघांविरुद्ध जिंकलीच नाही; यंदाही आव्हान कायम

USA इन, पाकिस्तान आऊट

दरम्यान, हा सामना रद्द झाल्याने दोन्ही संघांना एक एक गुण देण्यात आला. अमेरिकेचे पाच अंक झाले. या वाढलेल्या अंकंसह अमेरिकेने सुपर 8 फेरीत प्रवेश केला. या सामन्यात आयर्लंडने अमेरिकेचा पराभव करावा असे पाकिस्तानला वाटत होते. कारण या सामन्यात जर अमेरिकेचा पराभव झाला असता तर सुपर 8 फेरीत पोहोचण्याची पाकिस्तानची शक्यता कायम राहिली असती. परंतु सामना रद्द झाल्याने पाकिस्तानची वर्ल्डकपमधून सुट्टी झाली आहे. आता पुढील सामन्यात पाकिस्तानने आयर्लंडचा पराभव केला तरी पाकिस्तान सुपर 8 फेरीत प्रवेश करू शकणार नाही.

follow us

वेब स्टोरीज