ICC Women Cricket World Cup Prize Money : रविवारी 2 नोव्हेंबर रोजी भारत आणि दक्षिण आफ्रिका आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक 2025 च्या अंतिम सामन्यात आमनेसामने असणार आहे. या सामन्यात कोण बाजी मारणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे. भारतीय संघाने सात वेळा विजेता असलेल्या ऑस्ट्रेलियाला उपांत्य फेरीत हरवून फायनलमध्ये प्रवेश केला आहे तर दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडचा पराभव करत फायनलमध्ये प्रवेश मिळवला आहे. डी. वाय. पाटील या मैदानावर होणाऱ्या या सामन्यासाठी सध्या जोरदार तयारी देखील सुरु करण्यात आली आहे.
तर दुसरीकडे आयसीसीकडून या स्पर्धेसाठी बक्षीस रक्कम देखील जाहीर करण्यात आली आहे. आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक 2025 जिंकणाऱ्या संघावर (ICC Women Cricket World Cup Prize Money) पैशांचा पाऊस होणार आहे. या स्पर्धेच्या विजेता संघाला तब्बल 39.77 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. तर दुसरीकडे उपविजेता संघाला देखील 19.88 कोटी रुपये मिळणार आहे.
आयसीसीने महिला विश्वचषकाच्या बक्षीस रकमेत 2022 च्या आवृत्तीच्या तुलनेत 297 टक्क्यांनी वाढ केली आहे. भारतात झालेल्या 2023 च्या पुरुष विश्वचषकासाठी एकूण बक्षीस रक्कम 10 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स होती, तर 2025 च्या महिला क्रिकेट विश्वचषकासाठी बक्षीस रक्कम 3.5 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सवरून 13.88 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स करण्यात आली आहे.
THE ICC WILL DISTRIBUTE A RECORD BREAKING 122.55CR IN PRIZE MONEY FOR WOMEN’S WORLD CUP.
– A great work done by Jay Shah and the ICC! 👏🏆 pic.twitter.com/4EhqFrrGiW
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 1, 2025
आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषकाच्या इतिहासात भारतीय संघाने आणि दक्षिण आफ्रिका आतापर्यंत एकदाही विश्वचषक जिंकला नसल्याने रविवारी नवीन चॅम्पियन मिळणार आहे. यामुळे या सामन्यासाठी बक्षीस रक्कम 60 कोटी ठेवण्यात आली आहे. विजेत्या संघाला 4.48 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स मिळतील, जे अंदाजे 39.77 कोटी आहे. उपविजेत्या संघाला 2.24 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स मिळतील, जे अंदाजे 19.88 कोटी रुपये आहे.
आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक 2025 बक्षीस रक्कम
विजेता संघ: 4.48 मिलियन यूएस डॉलर (₹39.77 कोटी)
उपविजेता संघ: 2.24 मिलियन यूएस डॉलर (₹19.88 कोटी)
सेमीफायनलमध्ये पराभूत संघ: 1.12 मिलियन यूएस डॉलर (₹9.88 कोटी) प्रत्येकी
5वा आणि 6वा क्रमांक: 7 लाख यूएस डॉलर (₹6.17 कोटी) प्रत्येकी
7वा आणि 8वा क्रमांक: 2.8 लाख यूएस डॉलर (₹2.5 कोटी) प्रत्येकी
प्रत्येक संघासाठी स्वतंत्र बक्षीस: 2.5 लाख यूएस डॉलर (₹2.20 कोटी)
महाविकास आघाडीच्या ‘सत्याच्या मोर्चा’ विरोधात भाजपाचे मूक आंदोलन
ग्रुप स्टेजमध्ये प्रत्येक विजयासाठी: 34,314 यूएस डॉलर (₹30 लाख)
