विश्वचषक स्पर्धेसाठी भारताच्या संघाची घोषणा करण्यात आली असून यंदा भारत विश्वविजेता होईल का? असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांच्या मनात धुसमटत आहे, भारताचा कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा संघ खेळणार आहे, त्यामुळे रोहित सेना 2011 ची पुनरावृत्ती करु शकतो का? असा सवाल माजी क्रिकेपट्टू युवराज सिंगने केला आहे. त्यावर प्रत्युत्तर देताना माजी क्रिकेटपट्टू वीरेंद्र सेहवागने भारतीय संघाबद्दल भाकीत केलं आहे.
दिव्यांगांच्या निधीबाबत योग्य भूमिका न घेतल्यास बेमुदत उपोषण; बच्चू कडूंचा सरकारला इशारा
काय म्हणाला युवराज सिंग?
यंदा भारताचा कर्णधार रोहित शर्माला माजी कर्णधार एम. एस. धोनीसारखी खिलाडूवृत्ती दाखवून आयसीसीच्या विजेतेपद मिळवण्याची संधी आहे, ही संधी दशकभराची आहे, त्यामुळे रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली असलेल्या संघात ही क्षमता आहे का? हा मोठा प्रश्न आहे.
MK Stalin : मुलासाठी बाप मैदानात; उदयनिधींच्या वक्तव्यावर CM स्टॅलिन यांनी सोडले मौन
आयसीसी विश्वचषक स्पर्धेत 2011 ची पुनरावृत्ती करायची आहे, परंतु 2011 मध्ये भारत दबावाखाली चमकला. 2023 मध्ये पुन्हा कामगिरी करण्याचा संघावर दबाव आहे. हे बदलण्यासाठी आपल्याकडे पुरेसा वेळ आहे का? या दबावाचा आपण ‘गेम चेंजर’ म्हणून वापर करू शकतो का? असाही सवाल युवराजने केला.
Sukhee Trailer Out: शिल्पा शेट्टीच्या बहुप्रतिक्षित ‘सुखी’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित
सेहवागचं खास प्रत्युत्तर :
भारताचा माजी फलंदाज म्हणाला, रोहित शर्मा, विराट कोहली, शुभमन गिल, हार्दिक पंड्या आणि जसप्रीत बुमराह सारखे खेळाडू दबावाखाली झुकणार नाहीत, विरोधकांवर मात करतील, मी दबावाबद्दल बोललो तर, यावेळी आम्ही दबाव घेणार नाही, आम्ही देऊ! चॅम्पियन्स सारखे! असं खास प्रत्युत्तर सेहवागने युवराजच्या प्रश्नावर दिलं आहे.
दरम्यान, 12 वर्षांपूर्वी भारतात आयसीसी विश्वचषक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी भारताचा कर्णधार एम. एस धोनीच्या नेतृत्वाखालील संघाने मुंबईतील वानखेडे स्टेडियमध्ये ट्रॉफी उचलून 28 वर्षांची प्रदीर्घ प्रतिक्षा संपवली होती.