West Indies out of World Cup 2023: ICC क्वालिफायर 2023 च्या सुपर सिक्स सामन्यात, स्कॉटलंडने वेस्ट इंडिजचा (WI vs SCO) 7 गडी राखून पराभव केला. या पराभवासह वेस्ट इंडिज संघाचे विश्वचषकासाठी पात्र ठरण्याचे स्वप्न संपुष्टात आले. विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच वेस्ट इंडिजचा संघ या स्पर्धेत सहभागी होणार नाही. (icc-world-cup-qualifiers-2023-scotland-beat-west-indies-by-7-wicket-super-sixes-west-indies-out-of-world-cup2023)
स्कॉटलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दोन वेळा विश्वविजेत्या वेस्ट इंडिजने अत्यंत खराब फलंदाजी करताना 43.5 षटकांत 181 धावा केल्या. ब्रँडन मॅकमुलेनने तीन बळी घेतले. लक्ष्याचा पाठलाग करताना ब्रँडन मॅकमुलेन (69) आणि मॅथ्यू क्रॉस (नाबाद 74) यांनी विजय मिळवला. स्कॉटलंडने 43.3 षटकात 3 गडी गमावून 183 धावा करत सामना जिंकला.
वेस्ट इंडिजची अपयशी फलंदाजी
प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजची सुरुवात खराब झाली. संघाचे स्टार खेळाडू शामर ब्रुक्स (0), ब्रँड किंग (22), कर्णधार शाई होप (13), काइल मेयर्स (5) आणि निकोलस पूरन (21) हे लवकर पॅव्हेलियनमध्ये परतले. एका टप्प्यावर वेस्ट इंडिजने 81 धावांत 6 विकेट गमावल्या होत्या. संपूर्ण संघ 150 च्या आधी ऑलआऊट होईल असे वाटत होते, परंतु जेसन होल्डर आणि रोमन शेफर्ड यांनी 77 धावांची भागीदारी करून वेस्ट इंडिजला 181 धावांपर्यंत नेले.
टीम इंडियाच्या जर्सीवरुन बायजूस गायब, आता ‘ही’ कंपनी असेल प्रायोजक
ब्रँडन मॅकमुलेनची अष्टपैलू कामगिरी
स्कॉटलंडचा स्टार खेळाडू ब्रँडन मॅकमुलेनने पहिल्या गोलंदाजीत आश्चर्यकारक कामगिरी केली. मॅकमुलेनने कॅरेबियन खेळाडूंना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्याने 9 षटकात 32 धावा देत 3 बळी घेतले. मॅकमुलेनने वेस्ट इंडिजच्या पहिल्या तीन खेळाडूंचे बळी घेतले. त्याचवेळी लक्ष्याचा पाठलाग करताना ब्रॅंडन मॅकमुलेनने 69 धावांची शानदार खेळी करत सामना जिंकून दिला.
48 वर्षांत प्रथमच सहभागी होता येणार नाही
वेस्ट इंडिजने 1975 आणि 1979 मध्ये सलग दोनदा वर्ल्ड चॅम्पियन बनण्याचा मान मिळवला होता. आतापर्यंत खेळल्या गेलेल्या 12 विश्वचषक स्पर्धेच्या प्रत्येक आवृत्तीत वेस्ट इंडिजने भाग घेतला होता, परंतु यावर्षी वेस्ट इंडिज संघ 13व्या आवृत्तीत सहभागी होऊ शकणार नाही. 48 वर्षात पहिल्यांदाच वेस्ट इंडिज विश्वचषकासाठी पात्र ठरू शकला नाही.