टीम इंडियाच्या जर्सीवरुन बायजूस गायब, आता ‘ही’ कंपनी असेल प्रायोजक

टीम इंडियाच्या जर्सीवरुन बायजूस गायब, आता ‘ही’ कंपनी असेल प्रायोजक

Team India jersey : 2019 पासून भारतीय क्रिकेट टीमच्या जर्सी प्रायोजकाचे हक्क बायजूस कंपनीकडे होते. आता बीसीसीआयने बायजूसला हाटवून ड्रीम इलेव्हनसोबत करार केला आहे. त्यामुळे भारतीय टीमच्या जर्सीवर बायजूस ऐवजी ड्रीम इलेव्हन दिसणार आहे. ड्रीम इलेव्हनने 2023-27 पर्यंत टीम इंडियाच्या जर्सी प्रायोजकाचे हक्क मिळवले आहेत. 2019 पासून मार्च 2023 पर्यंत बायजूस टीम इंडियाचे प्रमुख जर्सी प्रायोजक होते. बीसीसीआय लवकरच यासंदर्भात अधिकृत घोषणा करणार आहे.

यापूर्वी चीनीची स्मार्टफोन कंपनी वीवोकडे आयपीएलचे टायटल स्पॉन्सर होते. भारत-चीनचे संबंध बिघडल्यानंतर यावरुन बीसीसीआयवर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. त्यानंतर 2020 मध्ये बीसीसीआयने वीवोसोबतचा करार संपुष्टात आणला होता आणि ड्रीम इलेवनला टायटल स्पॉन्सर केले होते. त्यावेळी बीसीसीआयने जर्सीवर मुख्य प्रायोजकाची मूळ किंमत 350 कोटी रुपये ठेवली होती.

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, महागाई भत्त्यात बंपर वाढ; केंद्रानंतर राज्य सरकारने घेतला निर्णय

बीसीसीआयने गेल्या महिन्यात क्रीडा क्षेत्रातील दिग्गज Adidas ला टीम इंडियाचे नवीन किट प्रायोजक म्हणून नियुक्त केले होते. बेटिंग, क्रिप्टोकरन्सी, तंबाखू यासह रिअल-मनी गेमिंग क्षेत्रातील कंपन्यांना बोर्डाने टीम इंडियाच्या प्रायोजकत्व अधिकारांसाठी बोली लावण्यापासून प्रतिबंधित केले आहे. बायजू प्रत्येक सामन्यासाठी बीसीसीआयला 5.5 कोटी रुपये आणि प्रत्येक आयसीसी सामन्यासाठी 1.7 कोटी रुपये देत होते, परंतु बीसीसीआयला मागील प्रायोजकापेक्षा नवीन करारातून कमी ऑफर मिळण्याची शक्यता आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube