IND vs AUS : श्रेयस अय्यर दुसऱ्या कसोटीतून बाहेर ? फिटनेसबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

दिल्ली : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सध्या बॉर्डर गावस्कर कसोटी (border gavaskar trophy) मालिका सुरुय. नागपुरात झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यामध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा जोरदार पराभव केला. या विजयाची चर्चा सुरु असताना टीम इंडिया (Team India) पुढे आता मोठी चिंता निर्माण झाली. नवी दिल्लीत होणाऱ्या कसोटी सामन्यात श्रेयस अय्यर पुनरागमन करु शकणार नाही. कारण, श्रेयस अय्यर (Shreyas […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out

Shreyas Iyer

दिल्ली : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सध्या बॉर्डर गावस्कर कसोटी (border gavaskar trophy) मालिका सुरुय. नागपुरात झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यामध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा जोरदार पराभव केला. या विजयाची चर्चा सुरु असताना टीम इंडिया (Team India) पुढे आता मोठी चिंता निर्माण झाली. नवी दिल्लीत होणाऱ्या कसोटी सामन्यात श्रेयस अय्यर पुनरागमन करु शकणार नाही. कारण, श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) अद्याप तंदुरुस्त नाही. तो पूर्णपणे फिट नसल्याने श्रेयस अय्यर दुसऱ्या कसोटी सामन्याला मुकणार आहे.

श्रेयस अय्यर दुसऱ्या कसोटीतून बाद

१७ फेब्रुवारी रोजी नवी दिल्लीच्या मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात दुसरा कसोटी सामना होणार आहे. या सामन्यामध्ये भारताचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर आपला खेळ दाखवू शकणार नाही. तो दुखापतीतून पूर्णपणे सावरलेला नाही. यामुळे अय्यरला दुसऱ्या कसोटी सामन्याला देखील मुकावं लागणार आहे. अय्यरच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार यादवला आणखी एक संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जसप्रीत बुमराह कधी करणार पुनरागमन ?

भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहविषयी देखील एक मोठी अपडेट समोर आली. जसप्रीत बुमराह बॉर्डर गावस्कर मालिकेला तोही मुकणार आहे. शिवाय तो आयपीएलमध्ये खेळण्याची शक्यता नाही. बुमराह आजून देखील पूर्णपणे फिट झाला नाही. यामुळे त्याला आणखी काही वेळ संघाबाहेरच बसावं लागणार आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया कसोटीचे वेळापत्रक

पहिला कसोटी – ९ फेब्रुवारी ते १३ फेब्रुवारी, नागपूर

दुसरा कसोटी – १७ ते २१ फेब्रुवारी, दिल्ली

तिसरा कसोटी – १ ते ५ मार्च, इंदूर

चौथा कसोटी – ९ ते १३ मार्च, अहमदाबाद शिवाय भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये १७ मार्चपासून तीन एकदिवसीय सामन्याची मालिका होणार आहे. पहिल्या कसोटी सामन्यात रविंद्र जाडेजा आणि आर अश्विन यांच्या फिरकीच्या जाळ्यात ऑस्ट्रेलियाचा संघ अडकला. दुसऱ्या डावात तर ऑस्ट्रेलियाच्या संघाला १०० धावांचा पल्लाही पार करता आला नाही. पहिल्या डावात जाडेजाने तर दुसऱ्या डावात अश्विन याने जोरदार फटकेबाजी केली होती. भारताने नागपूरात झालेला हा सामना १ डाव आणि १३२ धावांच्या फरकाने जिंकत मालिकेत १-० ची आघाडी घेतली.

Exit mobile version