Download App

पंत आउट होताच भारताचा डाव गडगडला !

  • Written By: Last Updated:

मुंबई : भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशीही खेळ सुरू आहे. 227 धावांच्या प्रत्युत्तरात भारताने तिसऱ्या सत्रापर्यंत 75 षटकांत 7 गडी गमावून 277 धावा केल्या आहेत. सामन्यात भारताचा फलंदाज ऋषभ पंतचे शतक अवघ्या काही धावांनी हुकले आहे. ऋषभ पंत येथे 93 धावांवर बाद झाला आणि त्याचे सहावे कसोटी शतक हुकले.

भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरी कसोटी सुरू आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताकडून श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत यांनी शानदार खेळी केली. मात्र, यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतचे शतक थोडक्यात हुकले आहे. पंतने 93 धावांवर बाद झाला. त्याने 107 चेंडूत 7 चौकार आणि 5 षटकार मारले.

तत्पूर्वी, श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत यांच्यात 150 हून अधिक धावांची भागीदारी झाली. दोन्ही फलंदाजांनी चांगला खेळ करत झटपट धावा केल्या. या जोडीने भारताला कठीण परिस्थितीतून बाहेर काढले असून पहिल्या डावाच्या जोरावर टीम इंडियाने आघाडी घेतली आहे. एका टप्प्यावर भारताने 94 धावांवर 4 विकेट गमावल्या होत्या. त्यानंतर या दोघांनी भारताची धावसंख्या 250 च्या पुढे नेली.

Tags

follow us