Download App

Ind Vs Aus ODI : भारतीय गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियाचा संघ गडगडला; विजयासाठी 189 धावांचे लक्ष्य

Ind Vs Aus : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला सामना आज मुंबई येथे सुरु आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 188 धावांमध्ये संपूष्टात आला आहे. भारताच्या तडाखेबंद गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियाचा फलंदाजांनी नांगी टाकली आहे. भारताकडून मोहम्मद शमी व मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी 3   विकेट घेतल्याआहेत. भारताला 50 ओव्हर्समध्ये विजयासाठी 189 धावांचे आव्हान आहे. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल मार्श याने  सर्वाधिक 81 धावा केल्या आहेत.

Letsupp Special : सर्वोच्च न्यायालयाचा निकाल विरोधात गेला तर, हा आहे भाजपचा ‘प्लॅन बी!’

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये तीन एकदिवसीय मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना आज खेळवला जात आहे. हा सामना मुंबईमधील वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. तत्पूर्वी भारताने कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाचा 2 -1 ने धुव्वा उडवला होता. त्यामुळे आता दोन्ही संघ एकदिवसीय मालिका जिंकण्याचा प्रयत्न करणार आहेत.

आज या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना खेळवला गेला. या सामन्यात भारताने टॉस जिंकला होता व सर्वप्रथम ऑस्ट्रेलिया संघाला फलंदाजीसाठी बोलावले होते. ऑस्ट्रेलियाकडून सलामीचा फलंदाज मिचेल मार्श याने 81 धावा केल्या आहेत. तर भारताकडून वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी व मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी 3 विकेट घेतल्या आहेत.

आमच्याकडे गुजरातची निरमा पावडर, गरज असेल त्याला स्वच्छ करून घेतो; भाजप आमदाराचे वादग्रस्त वक्त्यव्य

या व्यतिरिक्त भारतीय संघाचा कर्णधार हार्दिक पांड्या याने 1 विकेट घेतली आहे. तर फिरकी गोलंदाज रवींद्र जाडेजाने 2 विकेट व कुलदीप यादवने 1 विकेट घेतली आहे. त्यामुळे भारतासमोर आता विजयासाठी 189 धावांचे आव्हान आहे.

 

Tags

follow us