Download App

IND VS AUS : रोहित शर्माने ठोकले दमदार शतक! ऑस्ट्रेलिया विरुद्ध सामन्यात ठरला Hero

Rohit Sharma in IND vs AUS : भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) नागपूर कसोटीत दमदार शतक झळकावलं आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी पहिला सामना खेळला जात असून ऑस्ट्रेलियाचा संघ १७७ धावांवर सर्वबाद झाल्यावर भारत फलंदाजी करत आहे. दरम्यान एकीकडे भारताचे बहुतेक फलंदाज फेल होत असतानाच कर्णधार रोहित शर्माने शतक ठोकत भारतीय संघाचा डाव सावरला.

रोहित शर्माचे शतक झळकावताच एक खास विक्रम आपल्या नावावर केला. क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये (ODI, Test आणि T20) शतक झळकावणारा तो पहिला भारतीय कर्णधार ठरणार आहे. जागतिक क्रिकेटमध्ये केवळ ४ खेळाडूंना ही कामगिरी करता आली. रोहितच्या अगोदर बाबर आझम, दिलशान आणि फाफ डू प्लेसिस यांनी हा पराक्रम केला. दरम्यान रोहितने शतक झळकावताच मैदानात उपस्थित सर्वांनीच त्याचं टाळ्या वाजवून मोठ्या प्रमाणात कौतुक केलं. सामना खेळला जात असून ऑस्ट्रेलियाचा संघ १७७ धावांवर सर्वबाद झाल्यावर भारत फलंदाजी करत आहे. दरम्यान एकीकडे भारताचे बहुतेक फलंदाज फेल होत असताना कॅप्टन रोहित शर्माने शतक ठोकत संघाचा डाव सावरला.

सामन्यात सर्वात आधी ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत फलंदाजी निवडली. यानंतर या नागपूर कसोटीच्या पहिल्या दिवशी गुरुवारी ऑस्ट्रेलियन संघ १७७ धावांवर ऑलआऊट करण्यात आला. याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय संघ सध्या फलंदाजी करत आहे. भारतीय संघाकरिता सामन्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच आज रोहित शर्माने दमदार असं शतक झळकावलं. रोहितच्या या खेळीत १५ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. रोहितच्या शतकानंतर संपूर्ण ड्रेसिंग रूमने उभं राहून टाळ्या वाजवले आहे. दरम्यान रोहितबरोबर सध्या जाडेजा फलंदाजी करत असून दोघांनी अर्धशतकी भागिदारी पूर्ण केली.

ऑस्ट्रेलियाच्या (Australia) पहिल्या डावाचा विचार करता रवींद्र जाडेजाने सर्वोत्तम गोलंदाजी केली. त्याने २२ ओव्हरमध्ये ४७ रन देत एकूण ५ गडी बाद केले आहेत. तर दुसरीकडे अश्विनने ३ विकेट घेतल्या. तर सिराज आणि शमीने प्रत्येकी एक विकेट घेतली. ऑस्ट्रेलियाकडून यावेळी एलेक्स कॅरी याने ३७ तर लाबुशेनने ४९ धावांची सर्वाधिक खेळी करण्यात आली. या सामन्यात भारताकडून अगदी सुरुवातीपासून चांगली गोलंदाजी सुरु होती. दोन्ही सलामवीरांना शमी आणि सिराजने बाद केलं. पण यानंतर भारताच्या फिरकीसमोर ऑस्ट्रेलियाचे ८ गडी काही वेळातच बाद झाले. यावेळी सर्वात कमाल गोलंदाजी करणाऱ्या जाडेजाने ५ विकेट्स घेतल्या.

Tags

follow us