भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया ( Ind Vs Aus Test ) यांच्यात दुसरा कसोटी सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जात आहे. दुसऱ्या दिवशीच्या खेळात भारताचा पहिला डाव 262 धावांवर आटोपला. अक्षर पटेल ( Axar Patel ) व रवीचंद्रन अश्विन ( R Ashwin ) यांनी मोलाची भागिदारी करत भारताचा डाव सावरला. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 263 धावा केल्या होत्या.
आजचा खेळ सुरु झाला तेव्हा रोहित शर्मा व के. एल. राहुल यांनी संयमीत सुरुवात केली होती. पण काही काळाने भारताचा डाव गडगडला. राहुल बाद झाल्यानंतर आपली 100वी कसोटी खेळत असलेला चेतेश्वर पुजारा हा देखील लवकर बाद झाला. त्यानंतर विराट कोहली व रवींद्र जाडेजाने थोडा वेळ भारताचा डाव सावरला. यानंतर विराट कोहली 44 धावांवर बाद झाला. नंतर मात्र 139 धावांमध्ये भारताने 7 विकेट गमावल्या होत्या.
यानंतर अक्षर पटेल व रवीचंद्रन अश्विन यांनी भारताचा डाव सावरला. त्यांनी 114 धावांचा शतकी भागिदारी केली. यावेळी अक्षर पटेल याने 74 धावांची खेळी केली. तर अश्विनने 37 धावांची खेळी केली. या व्यतिरिक्त जाडेजाने 26 धावा केल्या. त्यामुळे भारताचा पहिला डाव 262 धावांवर आटोपला.
या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने 3 फिरकी गोलंदाज खेळवले आहेत. त्याच्या त्यांना फायदा देखील झाल्याचे दिसून आले आहे. कारण नॅथन लायन याने 5 विकेट घेतल्या आहेत. दरम्यान आस्ट्रेलियाने आपल्या दुसऱ्या डावात एक विकेट गमावली असून 61 धावा केल्या आहेत.