IND vs AUS : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या (Border Gavaskar Trophy) पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात भारताने ऑस्ट्रेलियावर २०० धावांची आघाडी घेतली आहे. नागपूरच्या जामठा क्रिकेट स्टेडियमवर सुरू असलेल्या 5 दिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 177 धावा केल्या. मार्नस लबुशेनने 49 धावा केल्या तर स्टीव्ह स्मिथने 37 आणि अॅलेक्स कॅरीने 36 धावा केल्या. भारताकडून जडेजाने पाच आणि अश्विनने तीन विकेट घेतल्या.
1ST Test. 136.4: Todd Murphy to Axar Patel 6 runs, India 397/9 https://t.co/SwTGoyHfZx #INDvAUS @mastercardindia
— BCCI (@BCCI) February 11, 2023
आज शनिवारी टीम इंडियाने पहिल्या डावात ९ बाद ३९७ धावा केल्या आहेत. कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक 120 धावांचे योगदान दिले. तर रवींद्र जडेजा 66 आणि अक्षर पटेल 52 धावांच्या वैयक्तिक स्कोअरवर नाबाद माघारी परतले.
काल कर्णधार रोहितचे शतक
काल उपाहारानंतर दुसऱ्या सत्राचा खेळ सुरू होताच, विराट कोहलीने भारतीय संघाला चौथा मोठा धक्का बसला. कोहली केवळ 12 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला, तर यानंतर फलंदाजीला आलेल्या सूर्यकुमार यादवने चौकार मारून कसोटी कारकिर्दीची सुरुवात केली, मात्र 20 चेंडूंचा सामना केल्यानंतर तोही 8 धावा करून नॅथन लियॉनच्या गोलंदाजीवर बाद झाला.
या सामन्यात 168 धावा होईपर्यंत भारतीय संघ पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने रवींद्र जडेजाच्या साथीने संघाच्या पुनरागमनाची सुरुवात केली. दरम्यान, रोहितने कसोटी क्रिकेटमधील आपले 9वे शतकही पूर्ण केले, तोपर्यंत भारतीय संघाने 5 विकेट गमावून 226 धावा केल्या होत्या.