भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा (WTC) अंतिम सामना लंडनमध्ये खेळवला जात आहे. या सामन्यात स्टीव्ह स्मिथने (Steven Smith) शानदार फलंदाजी करताना शतक झळकावले. याआधी ट्रॅव्हिस हेडने (Travis Head) सामन्याच्या पहिल्या दिवशी शतक झळकावले होते. हेडने दुसऱ्या दिवशी 150 धावांचा टप्पा पार केला. तर स्मिथने शतक पूर्ण केले. त्याच्या खेळीने अनेक विक्रम मोडीत काढले. हेड आणि स्मिथच्या जोडीने ओव्हलवर भारतीय गोलंदाजांना घाम फोडला. (ind-vs-aus-final-steve-smith-hit-century-world-test-championship-final-2023-london)
स्मिथच्या शतकी खेळीत 17 चौकारांचा समावेश होता. ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक कसोटी शतके झळकावण्याच्या बाबतीत तो तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. स्मिथने 31 कसोटी शतके झळकावली आहेत. या बाबतीत रिकी पाँटिंग पहिल्या क्रमांकावर आहे. पाँटिंगने 41 शतके झळकावली आहेत. स्टीव्ह वॉ 32 शतकांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. मॅथ्यू हेडन चौथ्या क्रमांकावर आहे. त्याने 30 शतके झळकावली आहेत. सर डॉन ब्रॅडमन 29 शतकांसह पाचव्या क्रमांकावर आहेत.
Steve Smith loves batting at The Oval 😍
Third century at the ground for the Aussie star ⭐
Follow the #WTC23 Final 👉 https://t.co/wJHUyVnX0r pic.twitter.com/jnZP7Z757F
— ICC (@ICC) June 8, 2023
विशेष म्हणजे नाणेफेक हारल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला आणि पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 327 धावा केल्या होत्या. हेड 146 आणि स्मिथ 95 धावांवर नाबाद होते. सामन्यातील दुसऱ्या दिवशी स्मिथने शतक पूर्ण केले. त्याचवेळी हेड 163 धावा करून बाद झाला. त्याने 174 चेंडूंचा सामना करत 25 चौकार आणि एक षटकार लगावला. हेड आणि स्मिथमध्ये 285 धावांची भागीदारी झाली. या दोन्ही फलंदाजांनी 408 चेंडूंचा सामना केला. एक रंजक वस्तुस्थिती अशी आहे की स्मिथ आणि हेड या जोडीने विक्रमी भागीदारी केली असून, ते दोघेही भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियासाठी सर्वात मोठी भागीदारी खेळण्याच्या बाबतीत चौथ्या स्थानावर पोहोचले आहेत.