Download App

गुवाहाटीत ऋतुराजनंतर मॅक्सवेलचे वादळ ! शेवटच्या चेंडूवर ऑस्ट्रेलियाने भारताला हरविले

  • Written By: Last Updated:

IND vs AUS : गुवाहाटीच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाचा(Australia) स्टार फलंदाज ग्लेन मॅक्सवेलची (Glenn Maxwell )जादू दिसली. एकवेळ भारताचा ताब्यात असलेल्या सामना मॅक्सवेलने फिरवत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला आहे. ग्लेन मॅक्सवेलने पुन्हा एकदा ट्वी-20 स्फोटक शतक झळकविले आहे. प्रसिद्ध कृष्णाच्या शेवटच्या चेंडूवर मॅक्सवेलने चौकार मारत ऑस्ट्रेलियाला पाच विकेटने विजय मिळवून दिला आहे. याचबरोबर पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत आजचा सामना जिंकत ऑस्ट्रेलियाने कमबॅक केले आहे. यापूर्वी भारताने दोन सामने जिंकले आहेत.

Beed Accident : देवदर्शनाला जाणाऱ्या भाविकांच्या कारला भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, दोन गंभीर जखमी

प्रत्युतरात ऑस्ट्रेलियाची सुरुवात चांगली झाली. सलामीवीर ट्रेव्हिस हेड आणि ऑरोन हार्डी यांनी पहिल्या गड्यासाठी 47 धावांची भागिदारी केली. परंतु अवेश खानने हेडला 35 धावांवर बाद केले. हेडने आठ चौकार मारले. तर हार्डी 16 धावांवर बाद झाला. ऑस्ट्रेलिया तिसरा धक्का जोस इग्लिसचा रुपात बसला. त्याला रवी बिष्णोईने बाद केले. मार्कस स्टॉईनसही 17 धावांवर बाद झाला. तेरा षटकात ऑस्ट्रेलियाचे चार फलंदाज 132 धावांत बाद झाले. ऑस्ट्रेलियाला पाचवा झटका टीम डेव्हिडचा रुपात बसला. परंतु चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या ग्लेन मॅक्सवेल आणि कर्णधार मॅथ्यू वेडने स्फोटक फलंदाजी करत संघाला जिंकून दिले आहे. ग्लेन मॅक्सवेलने 48 चेंडूत 104 धावांची स्फोटक खेळी केली. त्याने तब्बल आठ चौकार आणि तितकेच षटकार खेचले. शेवटच्या षटक टाकणाऱ्या प्रसिद्ध कृष्णाची मॅक्सवेलने जबरदस्त धुलाई करत संघाला सामना जिंकून दिला आहे.

Deepak Kesarkar : ‘आम्ही कधीच एकमेकांवर व्यक्तिगत टीका केली नाही’

गायकवाडचे शतक व्यर्थ
भारताचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad ) विश्वविजेता ऑस्ट्रेलियाची (Australia) गोलंदाजी आज फोडून काढली. ऋतुराजने स्फोटक खेळत टी-20 क्रिकेटमधील पहिले शतक झळकाविले आहे. पाच टी-20 सामन्याच्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात ऋतुराजने 52 चेंडूत शतक ठोकले आहेत. तो 123 धावांवर नाबाद राहिला आहे. ऋतुराजने आपल्या खेळीत चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला आहे. त्याने 13 चौकार आणि 7 षटकार मारले आहे. टी-20 मध्ये शतक झळकविणारा ऋतुराज हा भारताचा नववा फलंदाज ठरला आहे. भारताने ऑस्ट्रेलियासमोर 223 धावांचा डोंगर उभा केला आहे. ऑस्ट्रेलियाने शेवटचे षटक ग्लेन मॅक्सवेलला टाकण्यासाठी दिले. परंतु कर्णधार मॅथ्यू हेडचा हा निर्णय चुकीचा ठरला. ऋतुराज गायकवाड आणि तिलक वर्माने मॅक्सवेलची धुलाई केली. या दोन्ही फलंदाजांनी 30 धावा काढल्या. त्यात तीन षटकार आणि दोन चौकार मारले. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीला आमंत्रित केले. भारताची सुरुवात खराब झाली. सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि ईशान किशन हे लवकरच बाद झाले. यशस्वी सहा धावांवर बाद झाला. तर किशन खातेही उघडू शकला नाही. ऋतुराज आणि सूर्यकुमार यादवने डाव सांभाळला. सूर्यकुमार यादव 39 धावांवर बाद झाला. त्यानंतर तिलक वर्मा आणि ऋतुराज गायकवाडने 142 धावांची जबरदस्त भागिदारी केली. तिलक वर्मा 31 धावांवर नाबाद राहिला आहे. भारताने तीन बाद 222 धावा केल्यात.

Tags

follow us