Download App

Ind Vs Aus : के.एल. राहुलनंतर या खेळाडूला बाहेर करण्याची होत आहे मागणी

Ind Vs Aus :  भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या दोन संघांमध्ये बॉर्डर-गावसकर कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेत भारताने 2-1 अशी आघाडी घेतलेली आहे. या मालिकेतील पहिले दोन सामने हे भारताने जिंकले आहेत. तर तिसरा सामना जिंकत ऑस्ट्रेलियाने मालिकेत पुनरागमन केले आहे. या मालिकेत के. एल. राहुलचे प्रदर्शन अत्यंत खराब राहिले आहे. त्याच्या व्यतिरिक्त आणखी एका खेळाडूचे प्रदर्शन या मालिकेत चांगले नसून सोशल मीडियावर या खेळाडूला संघातून वगळण्याची मागणी केली जात आहे.

टीम इंडियाचा नियमित विकेट कीपर ऋषभ पंत कार अपघातात झालेल्या दुखापतीमुळे बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये खेळू शकला नाही. त्याच्या जागी केएस भरतला प्लेइंग 11 मध्ये संधी मिळाली आहे. भरतला चांगली कामगिरी करून संघातील स्थान पक्के करण्याची सुवर्णसंधी होती. मात्र ते करण्यात तो अपयशी ठरला आहे. केएल राहुलच्या खराब कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले होते, पण भरतचा खराब खेळही आता लपून राहू शकत नाही.

खुमखूमी असेल तर राजीनामा द्या, डिपॉझिट जप्त करु; तानाजी सावंतांना इशारा

आता भरत सोशल मीडियावर लोकांच्या रोषाचा बळी ठरत आहे. लोकांचे लक्ष केएल राहुलकडून भरतकडे वळले आहे असे दिसते. या मालिकेत भरतची आतापर्यंतची सर्वोत्तम धावसंख्या नाबाद 23 आहे. सोशल मीडियावर लोक वेगवेगळ्या प्रकारे भरतवर आपला राग काढत आहेत. भरताबाबत ट्विटरवर अनेक प्रकारचे मीम्सही पाहायला मिळत आहेत.

 

सध्याच्या मालिकेत भरतने 5 डावात फलंदाजी केली आहे. यादरम्यान तो एकदाही ३० धावांच्या वर खेळू शकला नाही. या मालिकेतील पहिल्या सामन्यात त्याला पहिल्या डावात केवळ 8 धावा करता आल्या होत्या. त्याचवेळी दुसऱ्या सामन्याच्या पहिल्या डावात हा खेळाडू 6 धावांवर बाद झाला. दुसऱ्या डावात त्याने नाबाद 23 धावा केल्या. त्याचवेळी, तिसऱ्या सामन्याच्या पहिल्या डावात तो 17 आणि दुसऱ्या डावात केवळ 3 धावांवर बाद झाला.

 

 

follow us