Download App

Ind Vs Aus : दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने नांग्या टाकल्या !

  • Written By: Last Updated:

इंदूरः तिसऱ्या कसोटीतील दुसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना खेळपट्टीवर टिकवू दिले नाही. अश्विन आणि उमेश यादव यांच्या घातक गोलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाचे सहा गडी अवघ्या 41 धावांत बाद झाले. त्यामुळे पहिले दिवशी बॅकफूटवर गेलेल्या भारतीय संघाला दुसऱ्या दिवशी चांगली कामगिरी करता आली आहे. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 197 धावांत संपुष्टात आला असला तरी 88 धावांची आघाडी घेतली आहे. भारताने दुसऱ्या डावात बिनबाद 13 धावा केल्यात. कर्णधार रोहित शर्मा ((Rohit Sharma) आणि शुभमन गिल नाबाद आहेत.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सध्या सुरू असलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या तिसऱ्या कसोटी सामना इंदूर येथे सुरू आहे. गुरुवारी इंदूरच्या होळकर स्टेडियमवर पाहुण्या संघाने 156/4 धावसंख्येवर पुढे खेळण्यास सुरूवात केली. परंतु एकही फलंदाज खेळपट्टीवर टिकाव धरू शकला नाही. अश्विनचे फिरकी गोलंदाजीच्या जाळ्यात ते अडकलेच. शिवाय उमेश यादवने ऑस्ट्रेलिया फलंदाजाला एकामागून एक तंबूत परतविले आहे. या संघाने 41 धावांत सहा विकेट गमावल्या. पीटर हँड्सकॉम्ब (19) आणि कॅमेरॉन ग्रीन (21) यांच्याशिवाय दुसऱ्या एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा पार करता आला नाही.

भारताकडून उमेश यादव आणि रविचंद्रन अश्विनने प्रत्येकी तीन बळी घेतले. पहिल्या दिवशी रवींद्र जडेजाने चार विकेट घेतल्या आहेत. दुसऱ्या दिवसाचे पहिले सत्र भारतीय गोलंदाजांच्या नावावर झाले आहे.

पहिला: रवींद्र जडेजाने ट्रॅव्हिस हेडला LBW केले.
दुसरा: रवींद्र जडेजाने लबुशेनला बोल्ड केले.
तिसरा: रवींद्र जडेजाने उस्मान ख्वाजाला डीप मिडविकेट बाऊंड्रीवर गिलकडून कॅचआऊट केले.
चौथा: रवींद्र जडेजाने स्टीव्ह स्मिथला केएस भरतकडून कॅचआऊट केले.
पाचवा: रविचंद्रन अश्विनने पीटर हँड्सकॉम्बला शॉर्ट लेगवर श्रेयस अय्यरकडून कॅचआऊट केले.
सहावा : उमेश यादवने कॅमेरून ग्रीनला एलबीडब्ल्यू केले.
सातवा : उमेश यादवने मिचेल स्टार्कला क्लीन बोल्ड केले.
आठवा : अश्विनने अॅलेक्स कॅरीला LBW केले.
नववा: उमेश यादवने टॉड मर्फीला बोल्ड केले.
दहावा: नॅथन लियॉन अश्विनने बोल्ड केला.

आर. अश्विन बनला नंबर 1 कसोटी गोलंदाज

 

Tags

follow us