Download App

Ind vs Aus: गुवाहाटीत ऋतुराजचे वादळ ! ऑस्ट्रेलियाची धुलाई करत टी-20 त झळकविले पहिले शतक

  • Written By: Last Updated:

Ruturaj Gaikwad Century: भारताचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad ) विश्वविजेता ऑस्ट्रेलियाची (Australia) गोलंदाजी आज फोडून काढली. ऋतुराजने गुवाहाटीच्या मैदानात स्फोटक खेळी करत टी-20 क्रिकेटमधील पहिले शतक झळकाविले आहे. पाच टी-20 सामन्याच्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात ऋतुराजने 52 चेंडूत शतक ठोकले आहेत. तो 123 धावांवर नाबाद राहिला आहे. ऋतुराजने आपल्या खेळीत चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला आहे. त्याने 13 चौकार आणि 7 षटकार मारले आहे. टी-20 मध्ये शतक झळकविणारा ऋतुराज हा भारताचा नववा फलंदाज ठरला आहे. भारताने ऑस्ट्रेलियासमोर 223 धावांचा डोंगर उभा केला आहे. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियानेही जोरदार सुरुवात केली आहे. चार षटकात एक बाद 47 अशी ऑस्ट्रेलियाची स्थिती आहे.

Uttarkashi Rescue Operation : ‘बाहेर येताच मजूर गळ्यातच पडले’; देवदुतांनी सांगितला ‘तो’ क्षण

ऑस्ट्रेलियाने शेवटचे षटक ग्लेन मॅक्सवेलला टाकण्यासाठी दिले. परंतु कर्णधार मॅथ्यू हेडचा हा निर्णय चुकीचा ठरला. ऋतुराज गायकवाड आणि तिलक वर्माने मॅक्सवेलची धुलाई केली. या दोन्ही फलंदाजांनी 30 धावा काढल्या. त्यात तीन षटकार आणि दोन चौकार मारले.

शिक्षकाने पत्नीचा गळा चिरला, मुलाचा उशी ठेऊन जीव घेतला अन् स्वत:ही संपला

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीला आमंत्रित केले. भारताची सुरुवात खराब झाली. सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि ईशान किशन हे लवकरच बाद झाले. यशस्वी सहा धावांवर बाद झाला. तर किशन खातेही उघडू शकला नाही. ऋतुराज आणि सूर्यकुमार यादवने डाव सांभाळला. सूर्यकुमार यादव 39 धावांवर बाद झाला. त्यानंतर तिलक वर्मा आणि ऋतुराज गायकवाडने 142 धावांची जबरदस्त भागिदारी केली. तिलक वर्मा 31 धावांवर नाबाद राहिला आहे. भारताने तीन बाद 222 धावा केल्यात.

प्रत्युतरात ऑस्ट्रेलियाची सुरुवात चांगली झाली. सलामीवीर ट्रेव्हिस हेड आणि ऑरोन हार्डी यांनी पहिल्या गड्यासाठी 47 धावांची भागिदारी केली. परंतु अवेश खानने हेडला 35 धावांवर बाद केले. हेडने आठ चौकार मारले. तर हार्डी 16 धावांवर बाद झाला. ऑस्ट्रेलिया तिसरा धक्का जोस इग्लिसचा रुपात बसला. त्याला रवी बिष्णोईने बाद केले. मार्कस स्टॉईनसही 17 धावांवर बाद झाला. तेरा षटकात ऑस्ट्रेलियाचे चार फलंदाज 132 धावांत बाद झाले आहे. ग्लेन मॅक्सवेल फलंदाजी करत आहे.

Tags

follow us